६० वर्षांचा वकिल ५० वर्षांच्या डॉक्टरला घेऊन फरार; प्रेमाची अनोखी दास्तान...



    गेल्या काही दिवसांपासून देशांत प्रेमाशी संबंधित अजिबोगरिब किस्से वाचायला व ऐकायला मिळत असून त्यामुळे तात्पुरते मनोरंजन जरी होत असले तरी आजरोजी समाजातील नैतिक पतन व अधोगतीचे जे काही किस्से समोर येत आहेत त्यावरुन समाजाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे हे पाहून भावी पिढीच्या भविष्याचा विचार करता अंगावर अक्षरशः शहारे आल्या शिवाय राहत नाहीत.


    बिहारमधील पूर्णिया येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून येथील एक ६० वर्षीय वकील एका ५० वर्षीय विवाहित महिला डॉक्टरला सोबत घेऊन पळून गेला आहे. जेव्हा त्या दोघांनाही पकडण्यात तेव्हा वकिलाने सांगितले की, ती त्याचे पहिले प्रेम आहे. दोघेही शाळेत एकत्र शिकले, तेव्हापासून ते एकमेकांवर प्रेम करत होते. तिची वाट पाहत त्याने आजपर्यंत लग्नसुद्धा केले नसल्याचे त्या वकिलाने पोलिसांना सांगितले आहे.

    महिला डॉक्टरच्या पतीने उशिरापर्यंत महिला डॉक्टर घरी न पोहोचल्याने पोलिसात तक्रार दाखल केली. बरीच शोधाशोध आणि शक्य तितक्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर, पोलिसांनी शुक्रवारी सहरसा येथून डॉक्टर महिला आणि वकिलाला ताब्यात घेतले.

   एका हिंदी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार विचित्र प्रेमकथेचे हे प्रकरण पूर्णियाच्या केके हाट पोलिस स्टेशन परिसरातील प्रभात कॉलनीच्या  डोनर चौकातील आहे. ११ मे रोजी सहरसा येथील प्रोफेसर कॉलनीत राहणारा ६० वर्षीय वकील येथे राहणाऱ्या एका महिला डॉक्टरला  सोबत घेऊन पळून गेला.

    रात्री उशिरापर्यंत महिला डॉक्टर घरी न पोहोचल्याने तिच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली. बरीच शोधाशोध आणि चौकशी केल्या नंतर,पोलिसांनी शुक्रवारी सहरसा येथून महिलेला आणि त्या वकिलाला ताब्यात घेतले. ती डॉक्टर महिला विवाहित आहे आणि तिला मुले आहेत. वकील अविवाहित आहे. त्याने पोलिसांसमोर दावा केला की तो त्याच्या ह्याच  डॉक्टर मैत्रिणीची वाट पाहत असल्याने त्याने लग्नच केले नाही.

   महिला डॉक्टर आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून मिळताच तिचा पतीही पोलिस ठाण्यात पोहोचला. संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर त्याने पत्नीला परत स्वीकारण्यास नकार दिला.अशा परिस्थितीत सदरहू डॉक्टर महिलेला तिच्या वकील प्रियकराच्या घरी पाठवण्यात आले. तर वकील संजीव कुमार ह्याला प्रियकर असलेल्या डॉक्टर महिलेला पळवून नेण्याच्या गुन्ह्यात तुरुंगात पाठवण्यात आले आहे.


      के.के. हाट पोलिस स्टेशनला दिलेल्या जबाबात संजीव कुमारने म्हटले आहे की तो त्या महिला डॉक्टरला त्याच्या लहानपणापासून ओळखत आहे. दोघेही शाळेत एकत्र होते. चांगले मित्र होते. ती महिला म्हणजे त्याचे बालपणीचे प्रेम. तो म्हणाला, "माझ्या मैत्रिणीने एमबीबीएस पूर्ण केले आणि ती डॉक्टर झाली. मी वकील झालो. आम्ही लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली पण तिच्या कुटुंबाला ते मान्य नव्हते आणि तिचे लग्न दुसऱ्या डॉक्टरशी लावून दिले. मी अजून लग्न केलेले नाही कारण मी तिची वाट पाहत आहे."

   वकील संजीव कुमार म्हणतो की, "आम्ही अनेक वर्षे भेटलो नाही.पण गेल्या वर्षी ३० वर्षांनंतर मी तिला तिच्या क्लिनिकमध्ये भेटलो. या एका भेटीत आम्ही पुन्हा एकमेकांच्या जवळ आलो. आम्ही पुन्हा बोलू लागलो व भेटू लागलो आणि आमचे प्रेम पुन्हा बहरायला लागले."


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या