सध्याच्या घडीला राज्यात नगर पालिका व नगर पंचायतींच्या निवडणुकांचा "माहोल" चांगलाच "गरम" झालेला असताना ऐन निवडणुकीच्या काळात राज्यभरातील महसूल विभागाच्या महसूल सहायक व मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार पदांवर पदोन्नती देण्याचे औचित्य काय आहे.? हे सर्वसामान्य जनतेच्या समजण्या पलीकडचे आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अखत्यारीतील विभागाने घेतलेल्या ह्या महत्त्वपूर्ण निर्णयाची मात्र सर्वत्र चांगलीच चर्चा होत आहे.
राज्याच्या अमरावती, पुणे व नागपूर महसूल विभागातील सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातील खालील नमूद कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रित, गट-ब) या संवर्गात सन २०२४-२५ या निवडसूची वर्षात सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सहमतीने नियमित पदोन्नती कोट्यात तसेच तदर्थ पदोन्नती कोट्यात रिक्त झालेल्या पदांवर खुल्या प्रवर्गात नियमित व तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांची नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना त्यांच्या नावापुढे दिलेल्या ठिकाणी करण्यात आली आहे.
अ) नियमित पदोन्नती :
१) मंडळ अधिकारी -
अमरावती विभाग.
दिव्यांग

0 टिप्पण्या