अकोला पोलिसांचा "गावराणी"वर दुसरा अटॅक...


   अकोला जिल्ह्यात येत्या काही दिवसांत होत असलेल्या नगर पंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा दुसऱ्यांदा एक दिवशीय धडक छापणार कारवाई करून  महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अंतर्गत ८७ केसेस व ९,६४,०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

     या आधी आठच दिवसांपूर्वी अकोला पोलिसांनी पूर्ण जिल्हाभरात ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवावर उठलेल्या "गावराणी"च्या विरोधात विशेष मोहीम राबवून एक दिवसीय धडक कारवाई करीत थोड्याथोडक्या नव्हे तर ह्या "जहरील्या गावराणी"वर तब्बल ८४ केसेस करून तब्बल ७,३३,००० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला होता.आज पुन्हा दुसऱ्यांदा तशीच कारवाई करीत ८४ केसेस करून अंदाजे साडे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.  त्यांच्या ह्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 
   अकोला पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यां समाजकंटकांच्या विरुद्ध दुसऱ्यांदा विशेष मोहीम राबविण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दि.२८.११.२०२५ चे सकाळी १२.०० वाजतापासून रात्री १२.०० वाजेपर्यंत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस पथकांनी एकूण ८७ ठिकाणी कारवाई केली आहे.
 
    या धडक कारवाईदरम्यान सुमारे ९,६४,०९० रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला, तर अवैध धंद्यात सामील असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ह्या मोहिमेअंतर्गत  अकोला जिल्हा पोलिसांनी एकूण ८७ केसेस करून ९,६४,०९० रुपयांच्या किमतीची जीवघेणी गावरान दारू व त्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करण्याची कारवाई केली आहे.

   या विषारी व जीवघेण्या गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होवुन सामाजिक शांतता भंग होते. या पार्शवभूमीवर अकोला पोलिस दलाने अशा समाजविघातक धंद्यावर कठोर कारवाई करताना जनतेचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी या पुढे सुध्दा नेहमी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यानिमित्ताने मिडियाशी बोलतांना सांगितले आहे.

   गावरानी दारू विरोधातील ही मोहीम सुरूच राहणार असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर दारू विक्री व ती तयार करणाऱ्या लोकांविषयी माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे तसेच निवडणुक प्रक्रीया भयमुक्त व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दल सज्ज आहे. कोणताही अनुचित प्रकार आढळुन आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व जनसंपर्क अधिकारी शंकर शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या