अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वाहन चालकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला...


    तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या अप. क्र. ३५२/२०२५, कलम ७८,७५,७५(२) भान्यास. सहकलम ०८,१२ पोक्सो अॅक्ट व सहकलम ३ (२) (व्ही.ए.) मधील आरोपी सत्यदेव नामदेव जवंजाळ, वय ४५, वर्ष रा. हिंगणी बु.ता.तेल्हारा जि.अकोला याने 
चौथ्या वर्गात शिकणा-या अल्पवयीन मुलीचा ट्युशनवरुन घरी येतांना लैंगिक छळ केल्याचे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रकरणातील केलेला आरोपीचा जामीन अर्ज अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एन.पाटील यांनी नामंजूर करीत फेटाळला आहे. 

   वरील आरोपी या प्रकरणात अकोला कारागृहात दि.०९.१२.२०२५ पासुन बंदीस्त आहे.

    या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद सादर केला की, या प्रकरणातील पीडित अल्पवयीन असल्याने तिच्या आईने पो.स्टे.हिवरखेड येथे फिर्याद दिली की, ती दिलेल्या पत्त्यावर  मुलगी पिडीता हिचेसह राहते व घरकाम करते. फिर्यादीचे पती हे नोकरीवर सी.आर.पी.एफ. मध्ये असुन सध्या ते जम्मु कश्मिर येथे कार्यरत आहेत. फिर्यादीचे सासु सासरे गावात राहतात व फिर्यादीचे दिर हे त्यांच्या कुटुंबासह वेगळया ठिकाणी राहतात. फिर्यादी व पिडीता वेगळया घरी राहते. फिर्यादीची मुलगी पिडिता ही इयत्ता चौथ्या वर्गात शिकत आहे व हिवरखेड येथील टावरी मॅडम यांच्याजवळ तीची ट्युशन आहे व ती शिकवणीला जात असते. फिर्यादीची मुलगी पिडिता ही हिंगणी बु. येथील सत्यदेव नामदेव जवंजाळ, वय ४५ वर्ष यांच्या चारचाकी सवारी गाडीत दररोज ट्युशनला ये जा करीत असते. तीची संध्याकाळी ०६.०० ते ०८.०० वा. पर्यंत ट्युशन असते. दि. ०८/१२/२०२५ रोजी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ५.३० वा पिडीता ही सत्यदेव जवंजाळ यांच्या गाडीत बसुन हिवरखेड येथे ट्युशनला गेली होती. रात्री अंदाजे ९.०० वा. पिडीता ही ट्युशन वरुन घरी परत आली. तेव्हा ती रडत होती. त्यामुळे फिर्यादीने तिला का रडत आहेस, असे विचारले असता तिने सांगितले की, ट्युशन संपल्यानंतर गाडी हिवरखेड वरुन गावात परत आल्यावर गावातील ट्युशन करीता असलेले सर्व मुले गाडीतुन उत्तरले असतांना मी गाडीमधे होती. तेव्हा गाडीवाले सत्यदेव काकांनी पिडीतेचा हात पकडून त्यांचे तोंड तिच्या हाताला घासले व म्हणाले की, तुला माझा राग येतो काय, असे म्हणून पिडीतेला दहा रुपये दिले. त्यानंतर पिडीतेच्या मांडीवरुन, पाठीवरुन हात फिरवत पिडीतेला तिच्या लघवीच्या जागी तोंड लावु देतेस काय असे म्हटले. त्यामुळे पिडीतेने आरोपीच्या हाताला झटका मारुन गाडीतुन खाली उतरुन घरी आली.
असे पिडीतेने तिच्या आईला सांगितले. 


   त्यानंतर फिर्यादीने ही बाब कर्तव्यावर असलेल्या आपल्या पतीला सांगितली असता त्याने सांगितल्यानुसार फिर्यादी तिच्या दीर व पिडीतेसह पोलीस स्टेशन हिवरखेड येथे तक्रार देण्यास गेले. अशा फिर्यादीच्या जबाणी रिपोर्टवरून हिवरखेड पोलिसांनी सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.आणि आरोपीला अटक करून प्रकरणाचा तपास करून त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली.

   त्यानंतर आरोपीने जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केल्यानंतर सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करताना न्यायालयात युक्तीवाद केला की, सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. सदर गुन्हयातील पिडीता ही अवघ्या ९ वर्षाची असुन तिचे वडील सी.आर.पी.एफ जम्मु काश्मिर येथे नोकरी करीत आहेत. त्यानी यातील आरोपीवर विश्वास ठेवुन स्वतःची चिमुरडी मुलगी आरोपीच्या भरवशावर त्याच्या गाडीमधे ट्युशन करीता पाठवित होते. परंतु आरोपीने या सर्व गोष्टींची तमा न बाळगता एवढया लहान मुलीचे अल्पवयीन अवस्थेचा फायदा उचलुन पिडीतेचा विनयभंग केला आहे. आरोपी हा जामीनावर सुटल्यास त्याची हिम्मत वाढून तो आणखी याच प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच फिर्यादी व पिडीतेसह एकटीच राहते त्यामुळे आरोपीपासून त्यांच्या जीवीतास धोका निर्माण होवू शकतो. तसेच आरोपीचे ह्या कृत्यामुळे फिर्यादी हिचे नातेवाईकांमधे रोष असून याच कारणावरुन आरोपी व फिर्यादीचे नातेवाईक यांच्यात वाद होवून गंभीर स्वरुपाचा गुन्हा होवु शकतो. तसेच आरोपीला जमानत मिळाल्यास या गंभीर प्रकरणात समजामधे चुकीचा संदेश जावु शकतो कारण पालक अत्यंत विश्वासाने त्यांच्या अल्पवयीन मुलामुलींना शाळेत अथवा शिकवणीकरता चालकावर विश्वास ठेवुन पाठवत असतात, तसेच आरोपी बालक तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो व तपासकामात व्यत्यय निर्माण करु शकतो. या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अकोट निखील पाटील, सहायक पोलीस अधिक्षक अकोट हे करत असून या प्रकरणाचा तपास अजुन पुर्ण झालेला नाही. तसेच या प्रकरणात अल्पवयीन मुलगी व तिच्या आईचे कलम भा.ना.सु.संहितेचे कलम १८३ नुसार वि.न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी कोर्ट क.०३ अकोला यांचे समक्ष बयाण नोंदविण्यात आले आहे. यावरील सर्व मुद्दे लक्षात घेता या आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद  सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला.  दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने आरोपी सत्यदेव नामदेव जवंजाळ याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या