अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात शहर उपायुक्त या पदावर राहीलेले विक्रम साळी यांची गतवर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२३ मध्ये अमरावती ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती.तर ३१ जानेवारी २०२४ च्या राज्याच्या गृह विभागाने काढलेल्या एका आदेशाने त्यांची बदली सहायक पोलिस महानिरीक्षक, नियोजन व समन्वय,पोलिस महासंचालक कार्यालय मुंबई या पदावर झाली होती. विक्रम साळी हे त्या पदावर त्याठिकाणी रुजू होण्यापूर्वीच ५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा नवीन आदेशानुसार त्यांची बदली पोलिस प्रशिक्षण केंद्र,अकोला येथे प्राचार्य म्हणून झाली होती.
तर आता पुन्हा एकदा नव्यानेच राज्याच्या गृह विभागाने काढलेल्या १५ फेब्रुवारीच्या आदेशाप्रमाणे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे एसआरपीएफचे समादेशक म्हणून पाठविण्यात आले आहे.
साधे सरळ, सुस्वभावी, सदा हसतमुख राहणारे अजातशत्रू म्हणून सगळ्या अमरावती जिल्ह्याला परिचित असलेले पोलीस अधिकारी विक्रम साळी यांच्या नावावर राज्याच्या पोलीस विभागात १५ दिवसांत तीनदा,तर तीन महिन्यांत चार वेळा बदली होण्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे.



0 टिप्पण्या