अकोटच्या पिडीत मुलीची अमरावतीच्या खासदारांनी घेतली दखल...

   पीडितेच्या आईवडीलांना मारण्याची धमकी देवुन बनावट लग्न प्रमाणपत्राचे आधारे लग्न झाल्याचे भासवुन तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी पवन नागले ह्याचा जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

    अकोट पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अप.क्रमांक ५४२ /२०२५ भान्यासं ६४(२), (एम),८१,८७,११५(२), ३३६ (३) ३५१ (२) भा.न्या.सं. मधील आरोपी पवन दिलीप नागले, वय ३३ वर्षे राहणार रा. शिवाजी नगर एलीचपुर वेस, अकोट,ता.अकोट, जि.अकोला या आरोपीने एका तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्या कुटुंबाला संपवायची भिती दाखवुन खोटे लग्न प्रमाणपत्राद्वारे लग्न झाल्याचे भासवुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज आज बुधवार दि.२४.१२.२०२५ रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी फेटाळला आहे. आरोपीला पोलीसांनी दि.१९/१२/२०२५ रोजी अटक केली असून तेव्हा पासुन हा आरोपी अकोला कारागृहात बंदीस्त आहे.

   

    या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जावर युक्तीवाद केला की, पिडीता फिर्यादीने दि. १५.१२.२५ रोजी पो.स्टे.अकोट शहर येथे फिर्याद दिली की, अकोट शहरातील रहिवाशी असलेला पवन दिलीप नागले हा फिर्यादीला सतत त्रास देत असल्याने फिर्यादीसह तिचे सर्व कुटुंब २०२१ साली बाहेरगावी राहण्याकरीता गेले. दि.०९.०१.२४ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान पवन दिलीप नागले याने फिर्यादीला फोन करून की,चोहोट्टा बाजार येथील सार्वजनीक महाविदयालयाजवळ ताबडतोब भेटण्याकरीता बोलाविले. आली नाही तर फिर्यादीच्या घरी येण्याची धमकी दिली त्यामुळे पिडीता, फिर्यादी पवनला भेटण्याकरीता सार्वजनीक शाळेजवळ गेली असता पवन नागले तिला म्हणाला की, तु माझ्यासोबत लग्न कर नाहीतर पिडीतेच्या घरच्यांना मारुन टाकील अशी धमकी दिली.त्या भितीपोटी फिर्यादी आरोपीसोबत गेली. आरोपी पिडीतेला अमरावती येथील एका ऑफीसमध्ये घेवुन गेला व पिडीतेची इच्छा नसतांना तिथे काही कागदपत्रावर पिडीतेच्या सहया घेतल्या आणि पिडीते सोबत गळयामधे हार टाकतांना फोटो काढून लग्न झाले व आरोपीजवळ लग्नाबाबतचे प्रमाणपत्र असल्याचे सागितले. त्यानंतर तेथुन पवन याने तिला  परतवाडा येथील एका लॉजवर नेले. त्याठीकाणी आम्ही रात्रभर थांबलो व सकाळी अकोट येथे पवन नागले याचे घरी आलो तेव्हापासून मी दि.०५/१०/२०२५ पावेतो पवनच्या घरीच त्याच्या सोबत राहत होते. असे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले असून सदर कालावधीत पवनने पिडीतेसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.इतकेच नव्हे तर शारिरीक सबंध करतांना अनैसर्गिक संभोग देखील करायचा त्यामुळे पिडीतेला खुप त्रास होत होता.हे सुद्धा त्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यानच्या काळात पिडीतेला दिवस गेलेत, परंतु पवनने पिडीतेला बळजबरीने अकोला येथील जिल्हा स्त्री रूग्नालयात नेवुन सप्टेंबर २०२४ मध्ये पिडीतेचा गर्भपात घडवून आणला. काही महिन्यापसुन पवन हा तो काम करीत असलेल्या बजाज फायनान्स मधील एका मुलीला नेहमी घरी घेवून यायचा व पिडीतेला म्हणायचा की मी त्या मुलीसोबत लग्न करणार आहे, तुला जे काय करायचे ते कर, यास पिडीतेने विरोध केल्यास पवन पिडीतेला मारहाण करायचा, घरातील कामे करत असतांना एके दिवशी पिडीतेला चंद्रविला ट्रस्ट, अमरावती येथील विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिसले त्यामध्ये पिडीतेचे नाव नव्हते. त्यावरून पिडीतेला समजले की, पवनने तिला खोटया प्रमाणपत्रााचे आधारे लग्न झाल्याबाबत खोटे सांगितलेले आहे, त्यामुळे पवनने तिला त्याचेसोबत लग्न झाल्याचे खोटे भासविल्याने पिडीता तिच्या आईवडिलाकडे दिनांक ०५/१०/२०२५ रोजी राहायला गेली.

     पीडिता असलेल्या फिर्यादीच्या अशा जबानी रिपोर्टवरुन अकोट शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुण तपासात घेण्यात आला. या प्रकरणात या पिडीता मुलीने अकोट शहर पोलीस स्टेशनला ०३.०९.२१ रोजी आरोपी पवन नागले याचे विरुध्द लेखी फिर्यादी दिली होती की आरोपीचे ब-याच मुलीसोबत लफडे आहेत व तो मुलींना ब्लॅकमेल करतो. वरील प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. सदर प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे बयाण घेणे बाकी आहेत. आरोपीला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर व पिडीतेवर दबाव आणू शकतो व आरोपीपासुन पिडीता व पिडीतेच्या कुटंबातील लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होवू शकतो. तसेच सदर गुन्हयातील आरोपी यास जामीन दिल्यास आरोपीला कायदयाचा धाक राहणार नाही. तसेच तो फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

   या प्रकरणामधे दि.०६.१२.२५ तारीख असलेले राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी पोलीस अधिक्षक अकोला यांना या प्रकरणात योग्य ती कठोर कारवाई करुन अहवाल पाठविण्यात यावा असे विनंती पत्र दिले होते. तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे यांना जिल्हाधिकारी अमरावती यांना चंद्रविला विवाह संस्था,विजय कॉलनी अमरावती या संस्थेवर कारवाई करण्यात यावी व तरुणींचे उध्वस्त होणारे आयुष्य वाचविण्यात यावे असे पत्र दिले होते.

   सदर गुन्हयाचा तपास प्राथमिक स्तरावर असून या गुन्हयाचा तपास पो.उप.नि. अविनाश मोहीते हे करीत असुन या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. सदरहू प्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेची कायदयात तरतुद आहे. सरकार पक्ष अशा महिला अत्याचार संबंधीच्या गंभीर प्रकरणात हा खटला जलद गतीने चालविण्यास तयार आहे. याकरीता या आरोपीला कारागृहातच ठेवण्यात यावे व आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करावा असा युक्तीवाद सरकारी वकील अजित देशमूख यांनी न्यायालयात केला तसेच सरकार पक्षाला अँड.ऋचा ठाकुर व अॅड एस.ए.वसु यांनी सहकार्य केले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर विद्यमान न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या