राजासाहेब,चिअर्स.! फीरसे एकबार "चिअर्स" तो बोलो...!



माझे मोठे बंधू ,गुरुबंधु, सिद्धहस्त लेखक, दिलदार रसिक, एक बिनधास्त कलंदार माणूस...!

स्व.बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीवर जीव ओवाळून टाकणारे,ओठात एक नि पोटात एक असणाऱ्यांचा तिटकारा करणारे, स्पष्टवक्ते, हजारोंची सभा जिंकून घेणारे तेजस्वी वक्ते, दिलेल्या शब्दाला जागणारे , बेईमानी आणि गद्दारी हे दोन शब्द शब्दकोषात नसणारे, कुठल्याही प्रकारचा जाती्यवाद नाकारणारे,कोणतेही मोठेपणाचे बिरुद नावासमोर लावण्याची गरज नसणारे, स्वतः मागे राहून कित्येकांना आमदार, खासदार करणारे, त्या काळातील विद्यार्थी सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख, राजा गावंडे..."मी आर. के. बोलतोय !" या गाजलेल्या स्तंभाचे स्तंभलेखक राजा गावंडे.

स्वतःचा महाविद्यालयीन मित्र आणि नातेवाईक स्व- जिल्ह्याचा भाजपाचा खासदार असताना "भाजपा की भाजीपाला ?" हा सनसनाटी लेख आपल्या स्तंभात लिहिण्याची ताकद बाळगणारे - "राजासाहेब गांवंडे"..!

"आमिष" म्हणून समोर आलेल्या कित्येक पदाना माझ्यासमक्ष लाथाडणारे, शेरोशायरीची कदर करणारे,मनस्वी रसिक, गझलेतील शेर आवडल्यावर "इरशाद" अशी दाद देणारे,माझं लिखाण वाचून, "डोकं चक्रावून जातं यार !" या माझ्याच एका लेखाचे शिर्षक उच्चारून मला दाद देणारे, माझे जिवलग मित्र माननीय राजासाहेब गावंडे यांचा आज द्वितीय स्मृतिदिन !..


"राजासाहेब", माझ्या लेखणीतून कधीतरी तुमचा स्मृतिदिन हा शब्द मला लिहावा लागेल अशी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती...

"राजासाहेब", लिहिण्यासारखं खूप आणि खरंच खूप सारं आहे...
काय लिहू ???

बस्स एवढंच लिहितोय... "राजासाहेब, कुछ साल और साथ रहते तो... बात कुछ और रहती"....!

खैर,"राजासाहेब", मुझे पता है, आप जहाँ भी होंगे - अच्छे ही होंगे !... हां , मै भी ठिक हूं , जैसा था,वैसा ही हूं... और वैसे ही रहुंगा.. ! झूठ बोलना और डरना तो हम दोनो को अपने गुरुजीने सिखाया ही नहीं ! पैसो से ज्यादा किमती इन्सान होता है,यही तो हमारे गुरुजी कहते थे ! ... मेरे बाबा ने यही तो हमें सिखाया था... "न.प. प्राथमिक मराठी शाळा में..!" हमारी प्यारी "शाळा" मे...

"राजासाहेब", एक बात कहू... ? आपकी याद हर दिन आती है यार... कुछ साल और साथ रहना था मेरे भाई ! बस इसलिये कि हम दोनो मिलकर जो बदलना चाहते थे , उसे जरूर बदल देते..!

© विजय अस्वार
    ९८५०३२२९०९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या