गेल्याच आठवड्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा दरम्यान अकोला जिल्हा परिषदेच्या त्या शिक्षकाने मारलेली आणि संपूर्ण जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरलेली ती "उंच उडी" त्याच्या आयुष्यातील अखेरची उडी ठरली असून त्याने मारलेली ती उंच उडी डायरेक्ट एसीबीच्या "लॉकअप" मध्येच पडली असून त्याला आता काही दिवस सरकारी पाहुणचार दिला जाणार आहे.
त्या कर्मचाऱ्याचे ज्या वृत्तपत्रांनी कौतुक केले त्याचवृत्त्तपत्रात आता त्याच्यावर झालेल्या कारवाईच्या बातम्या प्रसिद्ध होणार आहेत.
अकोला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात थोड्या वेळापूर्वी लाचखोरी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अकोला एसीबीच्या पथकाने लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्यावर लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबीचे उपअधीक्षक मिलिंद बहाकार यांच्या नेतृत्वातील पथकाने अकोला जिल्हापरिषदेच्या समाज कल्याण विभागात प्रभारी कर्मचारी म्हणून काम पाहणाऱ्या शैलेश बगाटे नामक शिक्षकाला ५ हजाराची लाच मागणी करून ३ हजार रुपये स्वीकारत असताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले असून अकोला जिल्हा परिषदेत एकचबोंधल उडाला आहे.
सदरहू कारवाई मिलिंद बहाकार यांच्या नेतृत्वात संदीप टाले,यांनी यशस्वी केली आहे

0 टिप्पण्या