"जावयाला" मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीच्या माहेरच्या लोकांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने नाकारला...


    पत्नीच्या सासरची मंडळी सुनेला त्रास देत असल्याने पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटना दररोजच सगळ्यांच्याच वाचण्यात येतात.पण पत्नीच्या माहेरच्या लोकांनी मानसिक त्रास दिला म्हणून जावयाने आत्महत्या केल्याच्या घटना फारच क्वचित घडतात.अशाच एका प्रकरणांत पत्नीच्या माहेरच्या अर्थात सासरच्या लोकांनी अतोनात मानसिक त्रास दिला म्हणून जावयाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याची घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे काही दिवसांपूर्वी घडली आहे.

  अमरावती येथील रहिवाशी असलेल्या पत्नीच्या माहेरच्या लोकांनी मानसिक त्रास दिला म्हणून तेल्हारा येथील एका जावयाने काही दिवसांपूर्वी ह्या मंडळीच्या मानसिक छळास कंटाळून पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणातील आरोपी पत्नी,सासु व सासरे यांच्यासह पाचही आरोपींचा अटकपूर्व जमानत अर्ज अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

    दि.१६.१२.२०२५ रोजी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी तेल्हारा शहर पोलीस स्टेशनला दाखल अप. क्र. ३५७/२०२५, कलम १०८.३ (५) भान्यासं मधील आरोपी १). मनोहर पांडुरंग रायबोले, सासरा,वय ६५ वर्ष २). सौ. सुनंदा मनोहर रायबोले, वय ५८ वर्ष, सासू ३). आकाश मनोहर रायबोले,वय २७ वर्ष,साळा, आरोपी क्रमांक. १ ते ३ राहणार श्रीनाथ वाडी अमरावती, ता. जि. अमरावती, ४). नंदु पांडुरंग रायबोले, वय ६१वर्ष, चुलत सासरा रा. आष्टी ता.भातुकली, जि. अमरावती, ५). स्वाती किरणकुमार मोरे, वय ३३ वर्ष, मृतकाची पत्नी रा.पंचायत समिती क्वार्टर समोर तेल्हारा ता. तेल्हारा, जि. अकोला ह.मु. श्रीनाथ वाडी अमरावती,ह्यांच्या  मानसिक छळास कंटाळुन जावयाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला या सर्व म्हणजेच पाचही आरोपीचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर केला आहे.

   या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करतांना युक्त्त्विाद केला की, या प्रकरणातील फिर्यादी मृतकाचा भाउ विजय मधुकर मोरे यांनी दि.०५.१२.२५ रोजी पो.स्टे. तेल्हारा येथे अशी फिर्याद दिली की, त्यांचा मोठाभाउ मृतक किरण मधुकर मोरे याचे लग्न सन २०१९ साली मनोहर पांडुरंग रायबोले यांची मुलगी नामे स्वाती रायबोले हिचे सोबत झाले होते. तेव्हा पासुन फिर्यादी व त्यांचे कुटुंब एकत्र राहत आहे. मृतकाला एक ५ वर्षाची मुलगी आहे. फिर्यादीची पत्नी लग्न झाल्यापासून मृतकासोबत विनाकारण वाद करुन भांडण करुन तिचे माहेरचे लोक सासरे मनोहर रायबोले सासु सुनंदा मनोहर रायबोले साळा आकाश रायबोले सर्व रा. अमरावती व वहिणीचे काका नंदु पांडुरंग रायबोले रा. आष्टी ता. भातकुली जि. अमरावती यांना बोलावुन घेत होती व माहेरी निघुन जात होती. मृतक हा काही दिवसांनी सासरी जावुन त्यांच्या पत्नीला समजावुन घरी परत आणत होता. तेव्हा हे सर्व लोक त्याला मानसिक त्रास देत होते. 

   दि.१२.११.२५ रोजी मृतकाची पत्नी हिने मृतकासोबत वाद केला व तिचे माहेरील आई वडील व भाउ यांना आमचे घरी बोलावुन घेतले होते व त्या सर्वांनी मृतकासोबत वाद करुन त्याचे अंगावर मारण्याकरीता धावले व मृतकाची  पत्नी  मुलीसह माहेरी निघून गेली होते. तेव्हा पासून मृतक हा त्यांच्या पत्नीला फोन करत होता. परंतु ती मृतकासोबत बोलत नव्हती. त्यामुळे त्याला खुप मानसिक त्रास झाला, त्यामुळे तो चिडचिड करत होता. 

   दि.२२.११.२५ रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान फिर्यादी घरी असतांना त्याचा मित्र प्रज्वल भटकर रा. तेल्हारा याने फोनवरुन माहिती दिली की, तुझा भाउ मृतक याने मला फोनवर माहिती दिली की त्याने काहितरी विषारी औषध घेतले असून तो गेट क्रमांक.२ जवळ वान प्रकल्प हिवरखेड रोड, तेल्हारा येथे आहे. तरी तु लवकर तिथे पोहोच. असे सांगितल्याने फिर्यादी त्याचवेळी त्याचे मित्र विजय मंगळे रा. अटकळी यांचेसह वान प्रकल्प तेल्हारा येथे गेटजवळ गेले असता फिर्यादीचा भाउ, मृतक किरणकुमार हा गाडी जवळ ओकारी करीत असतांना दिसला व त्याच्या अंगाचा  विषारी औषधाचा वास येत होता म्हणून फिर्यादी व त्यांचे मित्रांनी फिर्यादीचा भावाला, तात्काळ ग्रामिण रुग्णालय तेल्हारा येथे उपचाराकरीता घेवुन गेले व तेथे प्राथमिक उपचार केला. मृतकाची प्रकृती ही गंभीर असल्याने डॉक्टारांनी त्याला पुढील उपचारासाठी अकोला रवाना केले.परंतु  दि.२५.११.२५ रोजीपर्यंत मृतकाच्या प्रकृतीमधे सुधारण होत नसल्याने पुढील उपचाराकरीता खाजगी रुग्णालय केअर हॉस्पीटल अकोला येथे भरती केले. उपचार सुरु असतांना दि.२७.११.२५ रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान फिर्यादीचा भाऊ हा ईलाजा दरम्यान मरण पावला. नंतर दि.२९.११.२५ रोजी फिर्यादीने मृतकाचा घरी ठेवलेला मोबाईल फोन उघडून पाहला असता त्यामधे माझा भाउ मृतक विषारी औषध घेवुन आत्महत्या घेवुन आत्महत्या करते वेळी त्याचे मोबाईल फोन मध्ये व्हिडीओ तयार करुन सासरे मनोहर रायबोले, सासू सुनंदा रायबोले साळा आकाश रायबोले, मृतकाच्या पत्नीचे काका नंदु रायबोले यांनी संगणमत करुन कोणतेही कारण नसतांना अतिशय मानसिक छळ केल्यामुळे मृतक विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करत आहे. त्याने स्वतःच्या मोबाईलमधे काढलेला व्हिडीओ त्याची पत्नी स्वाती हिचे व्हॉट्सअॅप वर पाठवीला असल्याचे दिसून आले. तरीसुध्दा तिने आम्हाला मृतकाने विषारी औषध घेतल्याची माहिती दिली नाही. तसेच काही दिवसापुर्वी मृतकाने त्याला टॉर्चर केल्याबाबत लिहुन ठेवलेल्या एका पत्राचा फोटो दिसून आला. अशाप्रकारे माझ्या भावाच्या आत्महत्येस हे सर्व कारणीभुत असून त्यांचे विरुध्द कायदेशिर कारवाई व्हावी अशा फिर्यादीचे लेखी फिर्यादवरुन आरोपी विरुध्द पो.स्टे. तेल्हारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या प्रकरणात पो.स्टे. तेल्हारा चे ठाणेदार प्रकाश तुनकलवार व पी.एस.आय भटकर तपास करीत असून तपास पूर्ण झालेला नाही. गुन्हा दाखल झाल्यापासून वरील सर्व आरोपी हे फरार असुन त्यांची पोलीस कोठडीमधे आरोपीची विचारपुस व  सखोल तपास करणे आवश्यक आहे. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. यातील मृतक हयाने मरणाअगोदर यातील आरोपी नामे स्वाती मोरे हिच्या मोबाईल वर आपले स्वतःचे मरणाबाबत व्हिडीओ शेअर करुन मृतक हयाचे मरणाचे कारण यातील नमुद आरोपी आहेत हे स्पष्ट केले आहे व आरोपीनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करत आहे असे यातील मृतक हयाने सदर व्हिडीओ मधे स्पष्ट शब्दात म्हटले आहे. सदर कृत्याकरीता आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. 

    तसेच नमुद गुन्हयातील आरोपी नामे स्वाती किरणकुमार मोरे यांचेकडून मोबाईल जप्त व मृतक हयाचे संबधीत तपास करणे बाकी आहे. तसेच यातील आरोपी हयांनी संगणमत करुन यातील मृतक हयाला मानसिक त्रास दिला असे गुन्हयातील साक्षीदार यांनी आपल्या बयानात सांगितले आहे. या प्रकरणात १० वर्ष कारावासाची तरतुद करण्यात आली आहे. आरोपी यास अटकपुर्व जमानत दिल्यास आरोपी हे साक्षीदार व फिर्यादी व त्यांचे कुटुंबावर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला.या प्रकरणांत सरकार पक्षाला डॉ.मंगेश बोदडे यांनी सहकार्य केले व दोन्ही बाजूच्या  युक्तीवादानंतर वि.सत्र न्यायालयाने वरील पाचही आरोपीचा अटकपुर्व जमानत अर्ज नामंजुर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या