यवमाळचा ठाणेदार नरेश रणधीर अमरावती एसीबीच्या जाळ्यात अडकला...


   गेल्या बऱ्याच दिवसांपासून पोलिस दलातील अधिकाऱ्यांची लाचखोरी बंद असल्यासारखीच परिस्थिती होती.एसीबीने देखील आपले हात आवरते घेतल्यासारखे वाटत होते. मात्र ती बंद नव्हती तर चोरून लपून सुरूच होती हे आज यवतमाळमधील ठाणेदाराने लाचखोरीत रंगेहाथ पकडल्या जावून सिद्ध केले आहे.

   चोर जसा चोरी केल्याशिवाय राहू शकत नाही,एखादा अट्टल बेवडा दारूशिवाय राहू शकत् नाही तसाच लाचखोर पोलिसवाला लाचखोरी केल्याशिवाय राहूच शकत नाही हे आज यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ठाणेदार नरेश रमेशराव रणधीर, याने सिद्ध करून दाखविले आहे.

   यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील वर्ग १ चा अधिकारी असलेल्या नरेश रणधीर ह्या पोलिस निरीक्षकाला अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याच दालनात १ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडल्याने यवतमाळ जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून, नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटून गारठलेल्या वातावरणात चांगलीच गरमी आली आहे.

   काल गुरुवार दि.११/१२/२०२५ रोजी यातील तकारदार यांनी तक्रार दिली की, त्यांचे एका मित्राला पैश्याची गरज असल्याने त्यांनी मध्यस्थी करुन त्यांचे दुसरे मित्राकडून १०,००,००० रुपये घेवून ६ महिन्याकरीता त्यांना दिले. परंतु ज्या मित्राला पैसे दिले त्याने सहा महिने पुर्ण होवूनही घेतलेले पैसे अदयाप पावेतो परत दिलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.१०/१२/२०२५ रोजी ज्या मित्राला पैसे दिले तो परत करत नसल्या बाबतची तकार पो.स्टे.अवधुतवाडी, यवतमाळ येथे दिली असता, नरेश रणधीर, पो.नि. यांनी तक्रारदार यांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे मोबदल्यात ५,००,००० रुपये लाचेची मागणी केल्याबाबतची लेखी तक्रार दिली.

       सदर तक्रारीची आज शुक्रवार दि.१२/१२/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सत्यता पडताळणी दरम्यान लाचखोर ठाणेदार यांनी तक्रारदार यांचेकडे ३,००,००० लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असता, त्यानंतर लगेच आयोजित करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान लाचखोर ठाणेदार नरेश रणधीर, यांने तक्रारदार यांचेकडून मागणी केलेल्या लाच रक्कम पैकी १,००,००० रुपये लाच म्हणून स्विकारले वरुन लाचखोर ठाणेदार नरेश रणधीर, पो.नि. पो.स्टे. अवधुतवाडी, यवतमाळ यांस ताब्यात घेण्यात आले असुन ज्या पोलिस ठाण्यात लाचखोर नरेश रणधीरने ठाणेदारी केली त्याच यवतमाळ शहरातील अवधुतवाडी, पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.

   सदरहू कारवाई एसीबीचे अमरावती परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक बापू बांगर, यांचे मार्गदर्शना खाली पो.नि.चित्रा मेसरे, पो.नि.स्वप्निल निराळे, पो.शि.शैलेश कडू, उपेंद्र थोरात, वैभव जायले, चालक स.पो.उ. नि.सतीश किटूकले, चालक पो.कॉ. राजेश बहिराट यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या