कुहीचे तहसिलदार हिंगे यांची बदली झाल्याने पुन्हा कुही तहसीलदार पद रिक्त झाल्याने तात्पुरत्या स्वरुपात प्रभारी म्हणून बेला येथील अप्पर तहसीलचे तहसीलदार यांच्याकडे कुही तहसीलचे अतिरिक्त तहसिलदार म्हणून प्रशासनाच्या वतीने जबाबदारी देण्यात आली आहे.
गेल्यावर्षी तहसीलदार शरद कांबळे यांच्या बदली नंतर कुही येथील रिक्त जागेवर १९ ऑगस्ट २४ रोजी तहसिलदार म्हणून अरविंद हिंगे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
हिंगे यांनी नियुक्तीनंतर अल्पावधीतच तालुक्यातील अनेक शेतकरी संबंधी प्रलंबित प्रकरणे विशेष मोहीम राबवून मार्गी लावले होते. शिवाय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर प्रतिबंध लावला होता. तर आंभोरा पुलावरुन भंडारा जिल्ह्यातून येणाऱ्या अवैध रेती वाहतुकीला आळा घालत वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे तालुक्यात अवैध उत्खनन व वाहतूकीवर महसूल विभागाने चांगलाच लगाम लागला होता.
"सर्वसामान्य नागरिकांचा हितचिंतक तहसिलदार" म्हणुन त्यांचे नाव कुही तालुक्यात घेतले जात होते, मात्र नुकतीच त्यांची बदली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ओ.एस.डी. म्हणुन झाली आहे. त्यामुळे कुहीचे तहसिलदार पद रिक्त झाले आहे. सध्या प्रभारी म्हणून बेला अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदार विकास बिक्कड यांच्याकडे तालुक्याचा पदभार प्रशाननाने सोपविल्यामुळे आता पूर्णवेळ तहसिलदार म्हणून कोण येईल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगे यांच्या बदलीने अवैध उत्खनन व वाहतुकीला पुन्हा उधाण आले असल्याच्या चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात सुरु आहेत.


0 टिप्पण्या