अनुसूचित जमातीतील (एसटी) काहीजण धर्मांतर करून समाजाचे तसेच इतर धर्माचे असे दोन्ही फायदे घेतात. त्यामुळे भारतीय घटनेत या समाजासाठी असलेल्या तरतुदीमध्ये दुरुस्ती करून दोन्ही फायदे घेण्यावर बंदी आणावी. तसेच समाज एकजूट ठेवाला या उद्देशाने येत्या २३ मे रोजी संध्याकाळी ३ वा. पणजीमध्ये जनजाती सुरक्षा मंच, गोवातर्फे समाज संस्कृती संवर्धन महारॅली काढण्यात येणार असल्याची माहिती मंचचे संयोजक मोलू वेळीप यांनी दिली.
(पणजी : पत्रकार परिषदेत माहिती देताना मोलू वेळीप. बाजूला सूर्यनारायण सुरी, विनायक सुरतने व इतर.)
पत्रकार परिषदेत मोलू वेळीप यांनी सांगितले की, ही महारॅली पाटो-पणजी येथील पर्यटन भवन येथून सुरू होईल.पोस्ट ऑफिस,जुन्या सचिवालयाकडून ती आझाद मैदान येते येईल व तिचे सभेत रूपांतर होईल. या सभेला राज्याच्या विविध तालुक्याच्या काना कोपऱ्यातून सुमारे १० हजार एसटी समाजबांधव उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमाती संशोधन अधिनियम ३४२ मध्ये दुरुस्ती करावी, यासंदर्भात सभेत निर्णय घेण्यात येणार आहेत. यावेळी अखिल भारतीय संघटनमंत्री सूर्यनारायण सुरी व अखिल गोवा संयोजक विनायक सुरतने उपस्थित होते.
आदिवासी नेत्यांची उपस्थिती
या महामेळाव्याला भारतातून समाजाचे ज्येष्ठ आदिवासी नेते उपस्थिती लावणार आहेत. सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशसिंह उईके (निवृत्त न्यायाधीश उत्तरप्रदेश) तसेच मार्गदर्शक प्रमुख वक्ते डॉ. राजकुमार हसदा (राष्ट्रीय सहसंयोजक) उपस्थित राहणार आहेत.
जनजाती सुरक्षा मंचतर्फे देशभर अनुसूचित जमातीच्या आतापर्यंत २६ रॅली आयोजित करण्यात आल्या असून गोव्यातील ही २७ वी रॅली आहे.



0 टिप्पण्या