७६ वर्षीय आजारी बायकोचा खून करून ८० वर्षीय पतीने केली आत्महत्या...




   गेल्या काही वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या ७६ वर्षांच्या पत्नीचा खून करुन ८० वर्षीय प्राध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना नाशिक शहरात घडली आहे.

   अयुष्यभर येणाऱ्या सुखदुःखात सोबत राहून साथ देण्याची शपथ घेतलेली पत्नी अंथरुणाला खिळल्याने आणि तिच्या ह्या वेदना असह्य झाल्याने एका ८० वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापकाने त्याच्या त्याच प्राणप्रिय ७६ वर्षांच्या पत्नीचा गळा दाबून तिचा खून करीत तिची वेदनेतून सुटका केली.त्यानंतर ती केल्याची खात्री करून तिच्याच साडीने गळफास घेऊन स्वतःही आत्महत्या केली.

   नाशिकच्या जेलरोड भागात ही अत्यंत धक्कादायक घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली असून लता मुरलीधर जोशी (७६) व मुरलीधर रामचंद्र जोशी (८०) अशी त्या दाम्पत्याची नावे आहेत.

   ह्या दांपत्याला दोन मुले असून ही मुले नोकरी निमित्ताने दुसऱ्या शहरात राहतात. लता जोशी या आजारपणा मुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अंथरुणाला खिळकेल्या होत्या. दुपारी मुरलीधर जोशी यांनी 'मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, तिची आजारपणातून सुटका करीत आहे...' अशी चिठ्ठी लिहून ठेवल्यावर पत्नीचा गळा आवळला व त्यानंतर स्वतःही गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या