अकोट महसूल विभागातील आल्यापासूनच वादग्रस्त ठरलेल्या मंडळ अधिकारी गणेश भारतीच्या उपद्व्यापानी अकोट शहरातील नागरिक अक्षरशः वैतागले असून "मी म्हणेल तो कायदा" अशा वृत्तीने त्रस्त झालेले आहेत. त्याच्याविरुद्ध विभागीय आयुक्त व पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश निर्गमित केले आहेत.
अकोट महसूल मंडळ अधिकारी गणेश गोविंद भरती यांचे विरुद्ध कार्यवाही होणे बाबत
१) जिल्हाधिकारी अकोला यांचे निर्देश दि. २७/३/२०२५
२) संतोष झुनझुनवाला व इतर रा.अकोट ता. अकोट जि.अकोला यांचा तक्रार अर्ज दि.२६/३/२०२५ नुसार अकोट येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ही चौकशी सोपविण्यात आली आहे.
उपरोक्त विषयान्वये आकोट तहसील अंतर्गत अकोट शहर मंडळ अधिकारी गणेश भारती हे जनतेला अतिशय उर्मटपणाची वागणूक देतात आणि या ना त्या कारणावरून खरेदी,विक्री नोंदी जाणीवपूर्वक नामंजूर करून पुन्हा नोंद करण्या करीता पैशांची मागणी करून पैसे दिले तरच नोंदी मंजुर करतात.असे असंख्य फेरफार प्रदीर्घ विलंबाने मंजुर करणे, नामंजुर करणे. रजिस्ट्रार कडून आलेले ऑनलाईन फेरफार काहीतरी तूटी नमूद करून नामंजूर करतात, व नंतर त्यांचे हस्तकामार्फत त्या संबंधीत खातेदार यांना संपर्क करून आणि आर्थिक देवाण घेवाण झाली की नामंजूर केलेले फेरफार नियमबाह्यरित्या तलाठी यांना घेण्यास सक्ती करणे अथवा खातेदाराच्या नजरेत वाईट दाखविने असा प्रकार सुरु असल्याबाबत सदरहू तक्रार अर्जामध्ये नमूद केलेले आहे.
सदरहू आदेशासोबत तक्रार अर्जाची छायाप्रत उपविभागीय अधिकारी अकोट यांना पाठविण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी सूचीत केल्याप्रमाणे अर्जातील नमूद मुद्यांचे अनुषंगाने चौकशी अहवाल त्वरीत सादर करण्यात यावा असे आदेश बजावण्यात आले आहेत. असे प्र.निवासी उपजिल्हाधिकारी
विजय पाटील यांनी दिनांक ९ /४/२०२५ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात नमूद आहे.




0 टिप्पण्या