गेल्या बऱ्याच दिवसांपासून अमरावती शहरातील बस स्टॉप, नामांकित गर्दीचे चौक इतकेच काय तर गल्ली बोळात नाचत नव्हे तर "हिजडे चाळे" करून "छपऱ्या" लोकांचे मनोरंजन आणि "उडान टप्पू" लोकांचा टाईमपास आणि "कामाधंद्यात" असणाऱ्या लोकांच्या कामात अडथळे निर्माण करून स्वतःला फार मोठा "रिलस्टार" समजत अमरावती पोलिसांच्या विशेषतः वाहतूक पोलिसांच्या "इज्जतीचा भाजीपाला" करणाऱ्या "चालाक" देविदास इंगोलेला अमरावती पोलिसांनी अखेर "पोलिसी हिसका" दाखविलाच आहे.त्यामुळे अमरावती पोलिस खरोखरच अभिनंदनास पात्र ठरले असून सर्वच स्तरातून त्यांनी केलेल्या कारवाईचे "समर्थन" होत आहे.
देविदास इंगोले हा एस.टी.महा मंडळात चालक असून गेल्या वर्ष दीड वर्षांपासून त्याच्या डोक्यात रिलस्टार होऊन पैसे कमावण्याचे चांगलेच "भूत" घुसले होते.त्यामुळे जिथे जशी संधी मिळेल तिथे आपल्या कमरेला चार दोन "हिसके" देऊन आणि "मांडी"ला हलवित लोकांचे मनोरंजन करीत गर्दी जमविण्याचा धंदा सुरू केला होता.बस स्टँड,चौक व गर्दीच्या ठिकाणी असे "हिजडे धंदे" करून त्याचे व्हिडीओ युट्यूब वर अपलोड करून लाइक व व्ह्युज मिळविण्याच्या नादात ह्या देविदास इंगोलने अक्षरशः लोकांना "वैताग" आणला होता.
गेल्याच आठवड्यात अमरावती शहरातील सतत गजबजलेल्या "पंचवटी चौकात" एका महिलेला सोबत घेऊन अक्षरशः १५/२० मिनिटे चांगलाच "धुडगूस" घालून ह्या गर्दीच्या चौकातील वाहतूक ठप्प करण्याचा "कारनामा" केल्याने लोकांच्या "शिव्या खात" वाहतूक पोलिसांच्या व अमरावती शहर पोलिसांच्या "इज्जतीचा भाजीपाला" करण्याचा चांगलाच उपद्व्याप महामंडळातील चालक असलेल्या "चालाक" देविदास इंगोलेने केला होता.
त्यामुळे भर चौकात घडलेल्या ह्या प्रकाराने अमरावती पोलिसांची केवळ शहरातीलच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी चांगलीच "छीं थु" केली आहे.
पंचवटी चौकासारख्या गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी "वाहतुकीचा खोळंबा" करून स्वतःला "रिलस्टर" समजत "इज्जतदार" लोकांच्या शहरात एका "बाईला" जी "बायको होती की भाड्याने आणलेल्या बाईला" नाचवून त्याचे व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड केल्याने "चांगल्या घरची माणसे" व "संभ्रांत खानदानी" महिला देखील ह्या व्हिडिओ मुळे जगभर "व्हायरल" झाले आहेत.स्वतःचे "लाइक्स व व्ह्यू" वाढवून पैसे कमावण्या साठी इतरांच्या "इज्जतीला चव्हाट्या"वर मांडणाऱ्या ह्या देविदास इंगोलेच्या प्रकाराने अमरावतीकर मात्र चांगलेच संतापले आहेत.
बराच वेळ भर चौकात देविदास इंगोलेचा हा "धांगड धिंगा" चालू असताना चौकातील वाहतूक पोलिस त्याठिकाणी हजर नसल्यामुळे त्यांच्यावरही चांगलीच "आफत" ह्या नकली रिलस्टारने आणली आहे.
शहरातील जवळपास सर्वच वर्तमान पत्रांनी ह्या "हिजड्या धंद्या" ची दखल घेतल्याने अमरावती पोलिस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन ह्या "नकली स्टार" वर पोलिसी कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार शहर पोलिस उपायुक्त कल्पना बारावकर ह्यांनी सायबर पोलिसांना ह्या व्हिडिओ मध्ये नाचून वाहतुकीचा खोळंबा व अमरावती पोलिसांची "नाचक्की" करणाऱ्या देविदास इंगोलेचा अखेर शोध घेत त्याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.त्याच्या सोबत असलेल्या त्या महिलेचाही शोध घेण्यात येत असून तिच्यावरही पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.तर यानंतर युट्यूबवर अपलोड करण्यात आलेले इतरही व्हिडिओ तपासून जर कुणी असे प्रताप केलेले असतील तर त्यांच्यावरही पोलिस कारवाई करण्यात येईल असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.यानंतर जर कुठेही असे काही नकली स्टार रिल बनवित असताना निदर्शनास आले तर अमरावती पोलिसांना सूचित करण्यात यावे,त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल असेही आवाहन करण्यात आले आहे.










0 टिप्पण्या