महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाईल फोनवरून धमक्या देणारा नकली पत्रकार,शिवद्रोही प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर पोलिसांनी २४ मार्च रोजी प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून ताब्यात घेतल्यानंतर २५ मार्च रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर २८ मार्च रोजी पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता यावेळी न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात रवानगी केली आहे.
अत्यंत आक्षेपार्ह आणि संपूर्ण राज्यातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य करून राज्यभरातील शिवप्रेमींच्या संतापाच्या उद्रेकाचा सामना करीत असलेला प्रशांत कोरटकर हा जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती असून त्याच्या जामिनाबाबत न्यायालयाकडून काय निर्णय देण्यात येतो, हे उद्या दिसणारच आहे.
नागपुरातील नकली पत्रकार प्रशांत कोरटकर ह्याने फरारीच्या काळात नागपूर,चंद्रपूर, बैतूल, हैदराबाद, इंदोर आणि करीमनगर येथे वास्तव्य केले. यासह तो आणखी कुठे कुठे फिरला तेही ठिकाणांची पडताळणी करून त्याला मदत करणाऱ्या व्यक्तींची माहिती कोल्हापूर पोलिस घेत आहेत.कोल्हापुरातून नागपुरात गेलेल्या पोलिस पथकाने कोरटकर याची एक महागडी कार जप्त केली असून,तसेच त्याला आर्थिक व फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांचीही माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची कोल्हापूर पोलिसांची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.




1 टिप्पण्या
चेहर्यावरूनच करटलया मानसिक ते चा दिसतो हरामखोर😡
उत्तर द्याहटवा