अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पाटसुल गावातील ८२ वर्षीय "वयोवृध्द" महिलेवर बलात्कार करून आपली कामवासना शांत करणाऱ्या नराधम "लिंगपिसाटाचा" जामीन अर्ज अकोटच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
जिल्हा व सत्र तसेच विशेष न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी दहिहांडा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या अप.क्र. ३७२/ २०२३ भादविचे कलम ३७६, ४५२, ३२३, ५०६ मधील आरोपी शैलेश अरून वाघोडे वय ३८ वर्षे,धंदा शेती राहणार पाटसुल ता.अकोट, जि.अकोला या आरोपीने ८२ वर्षीय वयोवृध्द महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर दुसऱ्यांदा फेटाळला आहे.
या प्रकरणात ८२ वर्षीय वयोवृध्द महिलेने आरोपी शैलेश वाघोडे, राहणार पाटसुल ह्याच्या विरुद्ध दहिहांडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून बलात्काराचा गुन्हा दि. २८/१२/२०२३ रोजी दाखल करण्यात आला होता व त्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आली असुन आरोपी तेव्हा पासुन अकोला कारागृहात बंदीस्त आहे.
या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जावर लेखी उत्तर सादर करून युक्तीवाद केला की,आरोपी शैलेश वाघोडे याने ८२ वर्षीय फिर्यादी महिलेच्या घरामध्ये रात्री ८ वाजताचे दरम्यान जबदरस्तीने प्रवेश करून घराचे दोन्ही दरवाजे आतून लावून घेतले व या वयोवृध्द फिर्यादी महिलेचे डोके भिंतीवर आपटून नंतर तिला पलंगावर टाकून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल असे वाक्य उद्गारले व तिने सदरबाब कोणाला सांगीतली तर जिवाने मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात वयोवृध्द फिर्यादी महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवालामध्ये फिर्यादी महिलेच्या उजव्या व डाव्या स्तनावर चावल्याच्या खूणा तसेच उजव्या व डाव्या गुडघ्यावर खरचटल्याच्या खूणा दिसत असल्यासंबंधी वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे. आरोपीला शिक्षा होण्याइतपत पुरावा दोषारोपपत्रामध्ये उपलब्ध आहे. आरोपीला जामीनावर सोडल्यास तो साक्षीदारांना धमकावू शकतो व फिर्यादी महिलेच्या जीवितास धोका निर्माण होवू शकतो. या प्रकरणामध्ये जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा प्रस्तावित आहे. सरकार पक्ष हा खटला जलद गतीने चालविण्यास तयार आहे. तसेच फिर्यादी महिला ही विधवा आहे, आरोपी हा तिच्या शेजारी राहत असुन आरोपीने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्यामुळे तिला मानसिक धक्का बसला आहे. आरोपी हा अतिशय हिन मानसिकतेचा असुन त्याने केलेले कृत्य हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे. आरोपीला जामीनावर सोडल्यास तो फिर्यादी व इतर साक्षीदारावर दबाव टाकण्याची शक्यता आहे. तसेच आरोपी जामीनावर सुटल्यास त्याचे मनोधैर्य वाढेल आणि तो अशाच प्रकारचे गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे व त्यामुळे आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर करून त्याला कारागृहातच बंदीस्त ठेवण्यात यावे असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी विद्यमान न्यायालयात केला व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर विद्यमान कोर्टाने आरोपीचा जमानत अर्ज नामंजूर केला आहे.


1 टिप्पण्या
😡😠
उत्तर द्याहटवा