अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांची अमरावतीचे अप्पर आयुक्तपदी पदोन्नती...



     गत दोन वर्षांपासून अकोल्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले रामदास देविदास सिद्धभट्टी यांना शासनाने अप्पर आयुक्त या पदावर पदोन्नती दिली असून त्यांची अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

   निवडसुची वर्ष २०२४-२५ मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत महसूल विभागाच्या आस्थापना मंडळ क्र.२ यांनी केलेल्या शिफारसीनुसार       १) रामदास देविदास सिद्धभट्टी      २) अजय प्रल्हाद लहाने व              ३) सूरज रोहिदास वाघमारे यांची अप्पर आयुक्त म्हणून पदोन्नती करण्यात आलेली आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग शासन आदेश क्र.पदोन्नती -२०२५/प्र.क्र.१०/ई-१ दिनांक - २५ फेब्रुवारी २०२५ नुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले असून ह्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

    अमरावती विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात रामदास सिद्धभट्टी यांना सामान्य प्रशासन विभाग,अजय लहाने,महसूल तर सूरज वाघमारे अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या