स्वामिनी विधवा विकास मंडळ व सामिनी संघटनेच्या वतीने ४८ जेष्ठ निराधार विधवा महिलांना सन्मानित करून त्यांना लुगडे चोळी देऊन वीरस्री लताताई देशमुख यांची ४८ वी जयंती,सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात येणार आहे.
निराधार विधवा घटस्फोटीत एकल महिलांच्या विकास मुद्द्यावर लढणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना म्हणजे स्वामिनी विधवा विकास मंडळ होय. मंडळाच्या संस्थापिका वीरस्री स्व.लताताई देशमुख यांच्या २७ फेब्रुवारी रोजी जयंती उत्सवाचे आयोजन म्हणजे वैधव्यानंतर आजसारख्या कोणत्याही सुविधा न मिळालेल्या संयमी आणि कर्तुत्ववान विधवा महिलांचा केलेला सन्मान ही लताताईंना खरी श्रद्धांजली ठरेल.
या कार्यक्रमाचे आयोजन २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा.रिधोरा येथे करण्यात आले आहे. सरपंच विशाल दंदी यांचे सह सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणार्या एकल महिला श्रीमती कमलजीत कौर यांच्या अध्यक्षतेत सदर कार्यक्रम होणार आहे. सर्व क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींनी उपस्थित राहवे, असे आवाहन स्वामिनी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या