प्रहार संघटना नेते तुषार पुंडकर बहुचर्चित खुन खटल्याच्या सुनावणीला सुरवात...



   गेल्या चार वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित तुषार  पुंडकर हत्याकांडाची अकोटच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

   आज शनिवार दि.३०.११.२०२४ रोजी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांच्या न्यायालयात अकोट शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अप.क्र. ८०/२०२० भादंविचे कलम ३०२,१२० ब, २०१,३४ सहकलम ३/२५,५/२७, ७/२७ आर्म अॅक्ट या गुन्ह्यातील मृतक प्रहार संघटनेचे नेते तुषार पुंडकर गोळीबार हत्याकांड खटल्याच्या सुनावणी मध्ये या प्रकरणातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल भाष्कर शालीग्राम सांगळे, ब.नं.२४६,रा.पोलीस लाईन अकोट शहर याची साक्षी नोंदविण्यात आली आहे. तर इतर साक्षीदारांच्या साक्ष नोंदणी करीता दि. ९.१२.२०२४ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.


    या प्रकरणात आरोपी क्र.१ पवन सेदानी २) अल्पेश दुधे ३) श्याम नाठे ४)गुजन चिंचोळे आरोपी क्र.१ ते ४ रा.अकोट, क्र.५ निखील सेदानी रा.इंदोर मध्यप्रदेश क्र.६) शुभम जाट रा.फिफरिया जि. खरगोन,मध्यप्रदेश क्र.७) शहाबाज खान,शेंदवा, जि.बडवाणी मध्यप्रदेश या सर्व आरोपींनी कट कारस्थान करून दि. २१.०२.२०२० चे रात्री १०.०० वा.चे सुमारास तुषार पुंडकर यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून त्यांना ठार मारले.अशी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल भाष्कर सांगळे यांनी दिल्यावरून वरील सर्व आरोपीं विरूध्द तपास करून वरील कलमा अंतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.वरील ७ आरोपीं पैकी श्याम नाठे,राहणार अकोट हा आरोपी अजुनही कारागृहामध्ये बंदीस्त आहे. या प्रकरणात विद्यमान मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांनी सदरचा खटला जुन २०२५ पर्यंत निकाली काढावा असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे प्रकरणात विशेष सरकारी वकील विनोद फाटे यांचे मार्गदर्शनाखाली सरकारी वकील अजित देशमुख यांनी वरील खटल्यामध्ये एकुण सरकार तर्फे २७ साक्षीदारांची यादी दाखल केली असून त्यापैकी या प्रकरणातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल भाष्कर शालीग्राम सांगळे ब.नं.२४६ यांची साक्ष दि.१३.११.२०२४ रोजीवरील खुन खटल्यामध्ये नोंदविण्यात आली आहे.त्यामध्ये आज दि.३०.११.२०२४ रोजी सरकारी वकील अजित देशमुख यांनी विशेष सरकारी वकील विनोद फाटे यांच्यातर्फे घटना स्थळपंच म्हणुन दिनेश प्रल्हादराव मोहोकार व शैलेश विजयराव मेतकर या साक्षीदारांच्या नावे समन्स काढण्याची विनंती केली. त्यानुसार वरील खटल्यामध्ये साक्ष नोंदविण्या करीता दि.०९.१२.२०२४ ही तारीख निश्चत करण्यात आली आहे. उपरोक्त साक्षीदारांची साक्ष संपल्यानंतर पुन्हा नवीन साक्षीदारांची यादी देण्यात येईल असे विद्यमान न्यायालयास कळवीले आहे. या प्रकरणात आज दि.३०.११.२०२४ रोजी विद्यमान कोर्टाने या प्रकरणातील घटनास्थळ पंच दिनेश मोहोकार व शैलेश मेतकर यांच्या नावाने साक्ष समन्सचा आदेश जारी करून साक्षीकरीता दि.०९.१२.२०२४ रोजी साक्षी करीता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आरोपी तर्फे आज अॅड. सत्यनारायण जोशी, अॅड. दिपक कुटे, अॅड.राहुल वानखडे, तसेच सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विनोद फाटे व सरकारी वकील अजित देशमुख  न्यायालयात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या