केवळ काही रुपयांसाठी म्हणा वा क्षणिक सुखासाठी "दुसऱ्यांचा जीव" घेण्याच्या मानसिकतेत जगणाऱ्या जगातील करोडो लोकांना मलेशियातील थोडी थोडकी नव्हे तर हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकाने आश्चर्याचा धक्का दिला आहे. भौतिक सुखांचा त्याग करून ह्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडून "बौद्ध भिक्खू" म्हणून दीक्षा घेतल्याने संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे.
मलेशियातील टेलिकॉम टायकून आनंद कृष्णन यांचा मुलगा "वेन अजान सिरीपान्यो" याने वडिलांची ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती (५ अब्ज डॉलर) आणि मोहक जीवन नाकारले आणि संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धाचा आश्रय घेतला. त्याने बौद्ध भिक्षू बनून जगाला धक्का दिला आहे.
आनंद कृष्णन हे सुप्रसिद्ध दूरसंचार कंपनी एअरसेलचे मालक आहेत. एअरसेलने एकेकाळी प्रसिद्ध आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जलाही प्रायोजित केले होते.




0 टिप्पण्या