अवैध फलकबाजी करुन शहर विद्रुप करणारांवर गुन्हे दाखल...



  अकोला शहरात विनापरवाना अनधिकृतरित्या होर्डिंग,पोस्टर, बॅनर्स इत्यादी लावण्यात येऊ नये याबाबत प्रशासनाद्वारे वारंवार सुचना देण्यात आल्या होत्या.तरी ही महानगर  पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता शहरात अनेक ठिकाणी अवैधरित्या होर्डिंग्ज लावून शहर विद्रुपीकरनाचे कृत्य करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामूळे महानगरपालिका आणि जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे सयुक्त मोहीम राबवून दि.२९/११/२०२४ रोजी पोलीस स्टेशन अकोट फाईल आणि सिटी कोतवाली येथे महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपिकरणास प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये एकूण सहा आरोपीतांविरुध्द तिन गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.


   गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, गुंडप्रवृत्ती तथा इतर व्यक्तींचे होर्डिंग,बॅनर्स अवैध रित्या लावून शहर विद्रुपीकरणाचे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस अधिक्षक,अपर पोलीस अधिक्षक अकोला यांचे मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाद्वारे दंडात्मक करवाई तथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. नागरिकांना आव्हान करण्यात येते की, शहरात कोणीही महानगरपालिका प्रशासनाच्या परवानगीशिवाय बेकायदा होडिंग,पोस्टर,बॅनर लावू नये.असे आवाहन सतिश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या