राज्य पोलिस दलातील भारतीय पोलिस सेवेच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा आज फुटला असून जवळपास ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपूर्वी वादग्रस्त राहिलेले पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली नजिकच्याच सांगली जिल्ह्यात करण्यात आली आहे,तर पुणे शहर पोलिस आयुक्तालयात उपआयुक्त असलेले राजकुमार शिंदे यांना वाशिम जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे.
येत्या काही दिवसांत विदर्भातील काही जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत आहेत.



0 टिप्पण्या