मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीवर पत्रकार विजय शिंदे...



 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार मुल्यमापन समितीवर अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सचिव तथा अकोट येथील पत्रकार विजय मनोहरराव शिंदे यांची नियुक्ती करण्यास आली आहे.अकोट पंचायत समितीच्या गठीत या मूल्यमापन समितीला वर्धा जिल्ह्यातील कारंजा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायती मधील कामकाजाचे पुरस्कारासाठी मूल्यमापन करावे लागणार आहे. 

   या समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी  रमाकांत माळी असुन या समितीमध्ये विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (पंचायत), अगंणवाडी पर्यवेक्षिका, संगणक परिचालक व तालुका पत्रकार अशा चार सदस्यांचा समावेश आहे.

   "मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान" हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे राबविण्यात येणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे, जो २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून राबविला जात आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना सक्षम करून, लोकसहभागातून गावे अधिक कार्यक्षम, स्वच्छ आणि शाश्वत  बनवणे हा आहे.  

   या अभियानात सहभागी ग्रामपंचायतीना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार ५ कोटी रुपये, द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटी रुपयांचा आहे. विभागनिहाय एकूण १८ उत्कृष्ट ग्रामपंचायतींनाही पुरस्कार मिळणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या