राज्य पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची "दुसरी यादी" जाहीर...



    राज्य पोलिस दलात पावसाळ्यापूर्वीच बदल्यांचे वारे जोरात घोंघावत असून गेल्याच आठवड्यात वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या,त्यानंतर आज लगेच राज्य पोलिस सेवा व भारतीय पोलिस सेवेच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची दुसरी यादी गृह विभागाने जाहीर केली आहे.


    ह्यामध्ये गेल्या यादीमध्ये बदली करण्यात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांची करण्यात आलेली बदली रद्द करून त्यांना दुसऱ्याच ठिकाणी देण्यात आले आहे. ज्यात यवतमाळवरून नागपुरात देण्यात आलेले कुमार चिंता यांचे सह इतरही अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


    अमरावती येथे कार्यरत असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची बदली मुंबईला नियोजन व समन्वय विभागात करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणी त्याच पदावरून बदलून आलेले महेश पाटील हे अमरावती विभागाचे नवीन विशेष पोलिस महानिरीक्षक असतील.


   तर गेल्या जानेवारी महिन्यात पोलिस निरीक्षक पदावरून एसीपी,डीवायएसपी ह्या पदावर पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना येत्या शनिवार पर्यंत त्यांनी मागितलेल्या संवर्गाची पडताळणी करून सोमवार पर्यंत त्यांच्याही बदल्या व नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.

   त्यानंतर लगेच राज्य पोलिस दलाच्या पाठीचा कणा असलेले पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे समजते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या