अकोल्यातील वाडेगावचा ग्रामसेवक योगेश कापकर एसीबीच्या जाळ्यात अडकला...



   अकोल्यातील भगवान भरोसे चालत असलेल्या,तथा लाचखोरीने बरबटलेल्या जिल्हा परिषदेतील लाचखोर ग्रामसेवक योगेश कापकरला आज थोड्या वेळापूर्वीच अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ तब्बल ६० हजार रुपये घेत असताना पकडल्याने अकोला जिल्ह्यातील लाचखोरांच्या तंबूत खळबळ उडाली आहे.

      बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव ग्रामपंचायत मध्ये योगेश तोताराम कापकर हा ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे.ह्या ग्रामसेवकाने व त्याच ग्राम पंचायत कार्यालयात लिपिक म्हणून कामावर असलेल्या सुभाष सरप ह्या दोघांनी एका व्यक्तीला नाहरकत पत्रासाठी तब्बल ६० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.परंतु संबंधित व्यक्तीला ती द्यायची इच्छा नसल्याने त्याने अकोल्यातील एसिबीचे कार्यालय गाठून त्याबाबत रीतसर तक्रार नोंदविली होती.

       तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी करून आज सापळा कारवाई आयोजित केली असता योगेश कापकर व सुभाष सरप ह्या दोघांनाही लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

      ही कारवाई अकोला एसीबीचे उपअधीक्षक मिलिंद बहाकर,संदीप ताले व अस्लम शहा यांनी केली आहे.दरम्यान दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या