महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा आयपीएस अधिकारी ता.ना.मुख्यमंत्री विजय थलापतीचा खास...




   तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलापती यांनी आता राज्यकारभारआणि राजकीय सोयीचे डावपेचही सुरु केले आहेत. लवकरच होणाऱ्या पोट निवडणुकीच्या आधी त्यांनी काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या सोयीप्रमाणे बदल्या केल्या आहेत. यात प्रवीण डोंगरे या मराठी आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश आहे. डोंगरे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील (संगमनेर ) आहेत. ज्या मतदारसंघातून स्वतः थलपती निवडून आले होते, तेथे होणाऱ्या पोट निवडणुकीपूर्वी त्यांनी डोंगरे यांना बढती देत पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.त्यामुळे डोंगरे तेथे चर्चेत आले आहेत.


   अर्थात डोंगरे यांची आजवरची कामगिरी चांगली राहिली आहे. प्रवीण डोंगरे हे २०१६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या भ्रष्टाचारविरोधी विभागात एसपी व्हिजिलन्स म्हणून कार्यरत होते. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी पेट्रोकेमिकल अभियांत्रिकीमध्ये बीई ही पदवी प्राप्त केली आहे.डोंगरे यांचे संगमनेरमध्ये घर आहे. त्यांचे सुरवातीचे शिक्षण तेथेच झाले. त्यांचे वडील गट शिक्षणाधिकारी होते. एक भाऊ न्यायाधीश आहे. डोंगरे यांनी आदिवासी मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र चालविले आहे. 

  डिसेंबर २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते नागरी सेवेत दाखल झाले. प्रवीण डोंगरे यांनी यापूर्वीही तिरुचिरापल्ली जिल्ह्यात काम केलेले आहे. आता तेथे ते वरिष्ठ पदावर परत आले आहेत.

   डोंगरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात तिरुवेरुंबूर येथे केली होती. त्यावेळी ते सहाय्यक पोलिस अधीक्षक (ASP) म्हणून कार्यरत होते.प्रवीण डोंगरे हे त्रिचीमध्ये नियुक्ती मिळाल्यानंतर राज्यपालांचे एडीसी म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१९ ते २०२१  या काळात राजभवनात सेवा बजावली. त्यानंतर ते थेनी जिल्ह्याचे एसपी झाले. पुढे त्यांनी मदुराई आणि शिवगंगा जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी काही काळ मदुराई जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची बदली शिवगंगा जिल्ह्यात करण्यात आली होती.




   विशेष म्हणजे, तिरुचिरापल्ली (त्रिची) जिल्ह्यातील त्रिची ईस्ट विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय थलपती हे विजयी झाले होते. मात्र त्यांनी राजीनामा देत ही जागा रिक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात येथे पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत अभिनेत्री तृषा कृष्णन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण त्या आधी विजय यांनी  कडक शिस्तीचा अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त केला आहे,आणि त्यामुळेच प्रमोद डोंगरे यांच्या नियुक्तीला विशेष महत्व आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या