खरीप हंगाम ऐन तोंडावर असताना बुलढाणा जिल्ह्यात डीएपी खताचा भीषण तुटवडा निर्माण झाल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांना घेराव घातला.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्ह्यासाठी राखीव असलेला डीएपीचा बफर स्टॉक तात्काळ खुला करण्याची मागणी केली.
तुपकरांचा प्रशासनाला इशारा...
“दोन दिवसांत बफर स्टॉक खुला करा, अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडू. शेतकऱ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही. गरज पडल्यास अधिकाऱ्यांनाही फटकावू.!”
चिखली व मेहकर तालुक्यात डीएपी खताची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.



0 टिप्पण्या