अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील एका असहाय्य महिलेच्या पायात "घुंगरु" बांधून तिला नाचायला भाग पाडत, तिचेवर सतत बलात्कार करणाऱ्या, इतकेच नव्हे तर तिला जबरदस्तीने गोमांस खायला लावणाऱ्या आरोपी सरदार खान याचा जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
तेल्हारा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अप. १९०/२०२६ भान्यासंचे कलम क्र. ११५ (२).३(५),३५१ (२), ३५२,६४ (२), (एम),६९,७७ मधील आरोपी सरदार खान सत्तार खान, वय ४६ वर्षे रा.दहीगांव,ता.तेल्हारा,जि.अकोला या आरोपीने एका असहाय्य,विधवा महिलेशी प्रेमसंबध निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवित तिच्यासोबत काढलेले अश्लील फोटो व व्हीडोओ व्हायरल करण्याची धमकी देवुन तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज दि.१७.०४.२०२६ रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी फेटाळला आहे. सदरहू आरोपीला तेल्हारा पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या असून तो दि.१०.०४.२०२६ पासुन अकोला कारागृहात या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.
सदरच्या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जावर लेखी उत्तर सादर करून युक्तीवाद केला की, पिडीता असलेल्या फिर्यादीने १३.०२.२६ रोजी पो.स्टे. तेल्हारा येथे फिर्याद दिली की, फिर्यादीचे २००१ साली लग्न झाले होते,परंतु २०१५ मधे फिर्यादीचे पती मरण पावल्यानंतर ती तेव्हा लहान मुलाबाळासह दहीगांव अवताडे येथे असताना त्यांच्या घराजवळ असणारा सरदार खान सत्तार खान याचेसोबत फिर्यादीची ओळख झाली. काही दिवसांनी त्या दोघांमधे प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने फिर्यादीला सांगितले की, तो त्याच्या पत्नीला तलाक देणार आहे व आणि फिर्यादीसोबत लग्न करणार आहे. असे म्हणून आरोपीने दहीगाव येथील गंगाळ यांचे चक्कीच्या मागे रात्रीच्यावेळी शारीरीक संबंध ठेवले परंतु फिर्यादीसोबत लग्नास नकार दिला. नंतर फिर्यादीने तिच्या आईला ही घटना सांगितली. तेव्हा फिर्यादीच्या आईने आरोपीला विचारले असाता त्याने वाद घातला व फिर्यादीसोबत लग्न करण्यास नकार दिला. म्हणुन बदनामीच्या भितीने वडीलांची सर्व मालमत्ता विकुन दहीगांव येथुन पिंपळगाव बसवंत ता.निफाड जि. नाशीक येथे राहण्यासाठी गेले. त्यानंतर २०२५ ला फिर्यादीला सरदार खान याने फिर्यादीला फोन करणे चालु केले. आणि त्याने फिर्यादीला लग्न करतो असे म्हटले व तेव्हा फिर्यादीने नाही म्हटले असता बदनामी करण्याची धमकी दिली. नोव्हेंबर मधे सरदार खान याने फोन केला व फिर्यादीसोबत लग्न करण्याचे म्हणुन तो पिंपळगाव बसवंत ता.निफाड येथे आला आणि त्याने फिर्यादीला गाडीत बसवुन अंबिकानगर धुळे येथे घेवुन गेला. लग्न करणाचे वचन देवुन फिर्यादीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि शारीरीक संबध निर्माण करताना फिर्यादीचे फोटो व्हीडीओ सुध्दा काढले. तसेच तो फिर्यादीला जबरदस्तीने मांस खाण्यास सांगत होता व न खाल्यास मारहाण करीता होता. त्यानंतर दिनांक ३१.१२.२५ रोजी अंबिका नगर येथे असतांना सरदार खान याने त्याचा मित्र अफरोज खान याला घेवुन आला व त्याचेसोबत सुध्दा फिर्यादीला जबरदस्तीने शारीरीक संबध ठेवायला लावले. अंबिका नगर हा मुस्लीम परीसर असल्याने फिर्यादी घाबरुन गेली त्यानंतर फिर्यादीला समजले की, आरोपी तिच्यासोबत लग्न करणार नाही तो फक्त तिचा वापर करत आहे. ती त्याला काही न सांगता तीच्या आईसोबत रोकडीया नगर शेगाव येथे निघुन आली. त्यानंतर दि.०६.०२.२६ रोजी सरदार खान हा रोकडीया नगर शेगाव येथे आला व फिर्यादीला त्याच्यासोबत चालण्यास म्हणाला फिर्यादीने नकार दिला असता त्याने फिर्यादीचे फोटो व्हीडीओ व्हायरल करुन तिच्या मुलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी त्याचेसोबत गेली असता त्याचे राहते घरी मिल्लत नगर ता. शेगांव येथे तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले अशा जबानी रिपोर्टवरुन गुन्हा दाखल करुण तपासात घेण्यात आला.
वरील प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. तसेच आरोपी हा पिडीतेला गोमांस खायला लावत होता व पिडीतेच्या पायामधे "घुंगरु बांधुन" तिला नाचायला लावत होता. या गुन्हयातील आरोपी क्रमांक २ अफरोज खान रा. धुळे हा गुन्हा घडल्यापासुन फरार आहे. त्याच्यावर सुध्दा या पिडीतेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सदरहू आरोपीला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर व पिडीतेवर दबाव आणू शकतो व आरोपीपासुन पिडीता व तीच्या कुटंबाच्या जीवीतास धोका निर्माण होवू शकतो. सदर गुन्हा हिंदु मुस्लीम असल्याने यातील आरोपीला जामीन मिळाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो. तसेच यातील आरोपी हयांनी संगणमत करुन यातील फिर्यादी सोबत जबरदस्तीने शारीरीक संबध ठेवले असून आरोपी मदत करणारे व्यक्तीची आरोपी संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर गुन्हयातील आरोपी यास जामीन दिल्यास आरोपीला कायदयाचा धाक राहणार नाही. तसेच आरोपीला जामीन दिल्यास तो फरार होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण आरोपी हा घटना घडल्यापासुन बरेच दिवस फरार होता. सदर गुन्हयाचा तपास प्राथमिक स्तरावर असून या गुन्हयाचा तपास पो.उप.नि. भटकर हे करत असुन या प्रकरणाचा तपास पुर्ण झालेला नाही. या प्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेची कायदयामधे तरतुद आहे.
अशा महिला अत्याचार संबंधीच्या गंभीर प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमूख यांनी न्यायालयात केला तसेच सरकार पक्षाला अॅड. रविश कुलकर्णी यांनी सहकार्य केले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्या.बी.एन.पाटील यांच्या न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.



0 टिप्पण्या