अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणात कारागृहात असलेला आरोपी अब्दुल अन्सार याचा जमीन अर्ज आज अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर.पठारे यांनी फेटाळून लावला आहे.त्यामुळे ह्या हत्याकांडातील आरोपींच्या जामीन घेऊन बाहेर पडण्यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह लागलेले आहे.
अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनला दाखल असलेला अप. क्र. ०५/२०२६, कलम १०३(१),१०९,३(५) भान्यासं. मधील आरोपी अब्दुल अन्सार उर्फ अंदु अब्दुल गफ्फार, वय ४२ वर्ष, राहणार उर्दु हायस्कुल जवळ, अकबरी प्लॉट अकोट, ता.अकोट, जि. अकोला याचा काँग्रेस नेते हिदायतखाँ पटेल यांच्या खुन प्रकरणात दाखल केलेला आरोपीचा पहीलाच जामीन अर्ज आज दि.०६.०५.२०२६ रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर.पटारे यांनी फेटाळला
आहे. सदरहू आरोपी दि.२१.०१.२०२६ पासुन अकोला कारागृहात बंदिस्त आहे.
या प्रकरणात मृतक हिदायत पटेल यांचा पुतन्या फिर्यादी फतेह अली खान रफतउल्ला खान पटेल, रा. मोहाळा ता.अकोट, जि. अकोला यांनी पो.स्टे.अकोट ग्रा.येथे दि. ०६.०१.२०२६ रोजी आरोपी विरूध्द फिर्याद दिलेली आहे. हिदायत पटेल यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या पुतण्याला त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याला १). मोहम्मद बदरूजम्मा मो. आदील, ०२). राजु विठ्ठलराव बोचे, ३). संजय रामदास बोडखे, ४). फाजील आसीफ खाँ, ५). फारुख आसीफ खाँ पटेल हे देखील जबाबदार असून त्यांचेच सांगण्यावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले होते.फिर्यादीने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत ह्याचा उल्लेख केल्याने उपरोक्त सर्व संबंधितांवर सदरचा खूनाचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला. दि.०७.०१.२६ रोजी उपचारा दरम्यान हॉस्पीटल मधे जखमी नामे हिदायतउल्ला खाँ पटेल यांचा मृत्यु झाला. त्यामुळे सदर गुन्हयात १०३ (१) बी.एन.एस. प्रमाणे कलम वाढ करण्यात आली.
या प्रकरणात कारागृहात बंदिस्त असलेल्या वरील दोन्ही आरोपी ह्यांनी जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केल्यानंतर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद केला की, सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून, सदर गुन्हयातील अटक आरोपी अर्जदार याने घटनेपुर्वी दि.०५.०१.२६ रोजी ग्राम मोहाळा येथे जावुन गावात तसेच मस्जिद परीसरात कुठे कुठे सिसिटीव्ही कॅमेरा लावलेला आहे याबाबत पाहणी केली असल्याबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी आपले बयाणात सांगीतले आहे. तसेच सदर गुन्हयातील अर्जदार आरोपी हा फरार आरोपीतांचे संपर्कात होता असे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयात अटक आरोपी उबेद खॉ पटेल राजीक उर्फ कालु खाँ पटेल रा. मोहळा यास गुन्हा करण्याकरीता प्रवृत्त केले आहे. सदर गुन्हयातील अन्य संशयीत आरोपी सुध्दा शहरातुन पळुन गेलेले आहेत त्यांचा शोध घेवुन अटक करणे बाकी आहे. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असून आरोपीला जामीन मिळाल्यास तो फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दबाव किंवा धाकधापट करुन तपासात अडथळा आणु शकतो. तसेच आरोपीला जामीन मिळाल्यास मोहाळा गावात तसेच अकोट शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो. तसेच फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांमधे दोन्ही आरोपीविरुध्द रोष आहे त्यातुन आणखी अशाच स्वरूपाचे गंभीर गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरील सर्व मुद्दे लक्षात घेता या संशयीत आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा. असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. फिर्यादी तर्फे ऍड. मुन्ना खान व ऍड. श्रीरंग तट्टे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर वि.न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.



0 टिप्पण्या