अकोला जिल्हा शिवसेना (उबाठा) च्या जिल्हा प्रमुखांशी विनाकारण "पंगा घेणे" महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अकोट येथील प्रभारी उपअभियंत्याला चांगलेच महागात पडले असून त्याला कालच मुख्य अभियंत्यांनी "निलंबित" केले असून तात्काळ प्रभावाने यवतमाळ जिल्हा कार्यालयात संलग्न केले आहे.
विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्यावरही मजीप्राचा शाखा अभियंता राजेंद्र इंगळे गेल्या वर्षभरापासून कुणाच्या तरी "जोरावर" ज्याच्या त्याच्यावर वाघासारखा "डरकाळ्या" फोडत होता,परंतु त्याला गोपाल दातकर नावाच्या शिवसेनेच्या "वाघा"ने पुरते जेरीस आणून निलंबित करून अखेर "शिकार" केलीच आहे.
अकोट उपविभागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला उपविभागीय अधिकारी म्हणून प्रभार घेण्यापूर्वी राजेंद्र इंगळे मूर्तिजापूर उपविभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असताना काही महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसांत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्या होत्या. पगार काढण्यासाठी कंत्राटी महिलेला "शारीरिक सुखा"ची मागणी केल्याने मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मात्र ह्या महिलेच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असतांना व गुन्हे दाखल झाल्यावरही शाखा अभियंता राजेंद्र इंगळेवर निलंबित करण्यात येवून विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे प्रशासनातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्याने राजेंद्र इंगळे याची "मग्रुरी" चांगलीच वाढलेली होती. त्यामुळे संबंधित महिला वर्षभरापासून कामावर सुद्धा आलेली नव्हती,तर तिच्या "जीवा" लाही "धोका" असल्याबाबत त्या महिलेने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले होते.
त्याच दरम्यान सदरहू कंत्राटी महिलेवर अन्याय होऊनही शाखा अभियंता इंगळेवर कोणतीही कारवाई न करता उलट त्याला "बक्षीस" म्हणून अकोट उपविभागात उपअभियंता पदाचा "प्रभार" देवून एकप्रकारे पदोन्नतीच देण्यात आलेली होती.त्यामुळे "सत्तेची नशा" डोक्यात गेल्याने इंगळेने ज्याच्या त्याच्याशी "खाजवून" घेणे सुरू केले. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करणारे पोलिस आपल्या पाठीशी असल्याचा व आपण म्हणून तेच करतील अशाच पद्धतीने अकोट येथील उपविभागाचा कारभार सुरू झाला होता.जनतेच्या प्रश्नांसाठी उभी शासकीय यंत्रणा अंगावर घेण्याची मानसिकता असलेल्या शिवसेना (उबाठा)गटाच्या जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्यावर ह्याच मानसिकतेतून "जातीवाचक शिवीगाळ" केल्याचे गुन्हे ह्याच इंगळेने अकोट पोलिस स्टेशनला दाखल केले होते.
ह्या प्रकरणात दोन महिन्यांच्या न्यायालयीन लढाईत गोपाल दातकर यांना उच्च न्यायालयाने न्याय देत नियमित जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यानंतर प्रभारी उपअभियंता इंगळेने "शांत असलेल्या शिवसेनेच्या वाघांना विनाकारण दगड मारून डीवचल्याने जिल्ह्यातील शिवसेनेचे वाघ हात धुवून इंगळेची शिकार करण्यासाठी मागे लागले होते".
मूर्तिजापूर येथे असताना एका सामान्य कुटुंबातील महिलेच्या "अब्रू"वर हात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाखा अभियंता राजेंद्र इंगळेवर कारवाई करून योग्य न्याय मिळावा आणि या महिलेला पुन्हा कामावर घेण्यात यावे, याकरिता शिवसेनेने गेल्या काही दिवसांत लढा उभारला. शिवसेनेचे जिल्ह्यातील बाळापूरचे आ. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा करीत लावून धरल्याने राजेंद्र इंगळे याची कोंडी करून त्याला खिंडीत गाठलेच. इंगळेवर सरळ मार्गाने कारवाई होत नसल्याने काल शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांना "घेराव घालून" तीव्र आंदोलन केले,आणि त्याचा अगदी योग्य तोच परिणाम होऊन अखेर विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या आणि अकोट उप विभागात पोलिसांत केलेल्या तक्रारींचा फायदा उचलत आपलीच "मनमानी" करणाऱ्या प्रभारी उप अभियंत्याला "निलंबित" होऊन यवतमाळ सारख्या ठिकाणी जावून बसावे लागले आहे.
शिवसेनेच्या आंदोलनापुढे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना "नमते" घ्यावेच लागले असून अखेर उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे याला निलंबित केल्याने पीडित महिलेला एकदाचा न्याय मिळाला असून तिला पुन्हा कामावर घेत नियमित करण्यात येणार आहे. सदर महिला आजपासून कामावर रुजू होत आहे तर वर्षभरापासून तिचा थांबवून ठेवलेला थकित पगारही त्या महिलेला देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.अखेर शिवसेनेच्या वाघांनी ह्या उप अभियंत्याची "शिकार" केलीच असून त्यात सर्वांनाच न्याय मिळाला आहे.
मुर्तिजापुर येथे कंत्राटदारामार्फत कार्यरत असलेल्या महिलेला असभ्यपणे वर्तणुक दिली असल्या मुळे इंगळे विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे प्रस्तावीत करण्यात आलेले आहे.
राजेंद्र अमृत इंगळे,शाखा अभियंता विषयी लोकप्रतिनीधी यांना असभ्यपणाची वागणुक व सामान्य जनतेच्या तक्रारी वाढत असल्यामुळे व कार्यालयातील महिलेवर झालेल्या अन्याया प्रकरणी पोलीस स्टेशन मुर्तिजापुर येथे गुन्हा सुध्दा दाखल आहे व विधमंडळात लक्षवेधी प्रकरण सुद्धा प्रस्तावीत करण्यात आलेले आहे. सदर प्रकरणी इंगळे, शाखा अभियंत्याने शासकिय कर्मचा-यास शोभेल असे असभ्यपणाचे वर्तण केले असल्यामुळे तसेच सदर प्रकरणी वृतपत्रामंधे बातम्या प्रसारीत झाल्या असल्यामुळे जनमानसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रतिमा डागाळली गेली आहे. त्यास अनुसरुन त्यांचेकडून महाराष्ट्र नागरीसेवा (वर्तणुक) नियम १९७९ मधील नियम-३ व २२ चा भंग करण्याल आला आहे,त्यामुळे राजेंद्र इंगळे, शाखा अभियंता यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या तरतुदीनुसार व प्रदान करण्यात आलेल्या अधिकरानुसार दि.१४.०७.२०२५ पासुन निलंबीत करण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
त्या आदेशांत असेही नमूद करण्यात आले आहे की, हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत राजेंद्र इंगळे,शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग मुर्तिजापुर यांस शाखा अभियंता या पदावर त्यांचे मुख्यालय महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग यवतमाळ ठेवण्यात येत आहे. राजेंद्र इंगळे, शाखा अभियंता यांस कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यवतमाळ यांच्या पुर्व परवाणगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.त्यांना निलंबनाच्या कालावधीत, मनासे (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकण या काळातील प्रदाने) नियम १९८१ मधील नियम ६८,६९ मधील तरतुदीनुसार निलंबन निर्वाह भत्ता कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यवतमाळ यांचे कार्यालयातुन काढण्यात येतील. निलंबन काळात कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा धंदा करता येणार नाही. व तसे केल्यास गैरवर्तणुक समजण्यात येऊन ते शिस्तभंगाचे कार्यवाहीस पात्र ठरतील आणि त्यांस आपल्या निर्वाह भत्त्यावर हक्क सांगता येणार नाही.जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता एस.एस. गव्हाणकर,यांनी हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.







1 टिप्पण्या
कडक कारवाई होत नाही त्यामुळे ह्या लोकांच्या अंगात येते, हरामखोर साले😏😡😒😢
उत्तर द्याहटवा