राज्याच्या महसूल खात्यातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना आय.ए.एस. कॅडर, अमरावतीच्या दोघांचा समावेश...



   महाराष्ट्रातील महसूल विभागातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली असून केंद्र सरकारच्या पर्सनल,पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. 

   महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील १२ ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज दि. १४/७/२०२५ ला आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. ह्या सर्व १२ अधिकाऱ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती दिली आहे. 


    ह्या कॅडर प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये विदर्भातील विशेषतः अमरावती महसूल विभागातील दोघा अधिकाऱ्यांचा समावेश असून गजेंद्र बावणे व श्रीमती आशा पठाण ही त्यांची नावे आहेत. दोघांनीही अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर काम केलेले आहे.गजेंद्र बावणे हे "वाइल्ड लाइफ फोटोग्राफी" साठी देशात प्रसिद्ध आहेत.


    महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवीन महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.तर इतर अधिकाऱ्यांना देख यापासून प्रेरणा मिळाली असून प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना चांगलेच यश मिळते हा संदेश या अधिकाऱ्यांना मिळालेल्या आयएएस कॅडर मुळे पोहोचला आहे.

    येत्या काही दिवसांत १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील रिक्त असलेल्या जागांवर या १२ नवीन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

 आय.ए.एस.कॅडर मध्ये पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) विजयसिंह देशमुख

२) विजय भाकरे

३) त्रिगुण कुलकर्णी

४) गजानन पाटील

५) महेश पाटील

६) पंकज देवरे

७) मंजिरी मनोलकर

८) आशा पठाण

९) राजलक्ष्मी शहा

१०) सोनाली मुळे

११) गजेंद्र बावणे

१२) प्रतिभा इंगळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या