महाराष्ट्रातील आघाडीची असलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले आहे. प्रवीण गायकवाड हे आज अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या नियोजित कार्यक्रमासाठी आले असताना शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी त्यांना काळे फसल्याची घटना आताच काही वेळापूर्वी घडली असल्याची माहिती आहे.
प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन यापूर्वीच आक्रमक झाले होते.तसेच याचसाठी यापूर्वी शिवधर्म फाउंडेशन ने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते.परंतु त्याची योग्य ती दखल न घेतल्यामुळे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते.




0 टिप्पण्या