राज्य शासनाने नुकत्याच महसूल विभागातील १२ अधिकाऱ्यांना आयएएस कॅडरमध्ये पदोन्नती दिली असून काल त्यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.तर त्यांच्या सोबतच इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
१) एम.एम. सूर्यवंशी (आयएएसः एससीएसः २०१०) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांची वसई-विरार महानगरपालिका वसई येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२) दीपा मुधोळ-मुंडे (आयएएसः आरआरः २०११) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड पुणे यांची पुण्यात समाज कल्याण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३) नीलेश गटणे (आयएएसः एससीएस: २०१२) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
४) ज्ञानेश्वर खिलारी (आयएएसः एससीएस: २०१३) संचालक, ओबीसी, बहुजन कल्याण, पुणे यांची अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५) अनिलकुमार पवार (IAS:SCS: २०१४) महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, वसई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, MMRSRA ठाणे इथं नियुक्त करण्यात आली आहे.
६) सतीशकुमार खडके (IAS:SCS: २०१४) संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय मुंबई यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे इथं नियुक्त करण्यात आले आहे.
७) भालचंद्र चव्हाण (IAS: नॉन-SCS: २०१९) आयुक्त, भू-सर्वेक्षण विकास संस्था, पुणे यांची संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई इथं नियुक्त करण्यात आले आहे.
८) सिद्धार्थ शुक्ला (IAS:RR: २०२३) दिनांक ०२.०७.२०२५ च्या आदेशात बदल करुन सहाय्यक जिल्हाधिकारी, गोडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी म्हणून ITDP, धारणी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी उपविभाग, अमरावती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
९) विजयसिंह शंकरराव देशमुख (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर बढती) अतिरिक्त आयुक्त-२, छत्रपती संभाजीनगर विभाग यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१०) विजय सहदेवराव भाकरे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, भंडारा यांची सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
११) त्रिगुण शामराव कुलकर्णी (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर बढती) अतिरिक्त महासंचालक, MEDA, पुणे यांची यशदा, पुणे येथे उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१२) गजानन धोंडीराम पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
१३) पंकज संतोष देवरे (अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, लातूर यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणे येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१४) महेश भास्करराव पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस म्हणून पदोन्नती) अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) पुणे विभाग यांची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे इथं आयुक्त, म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
१५) श्रीमती मंजिरी मधुसूदन मानोलकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी, आयएएस म्हणून बढती) सहआयुक्त, (पुनर्वसन), नाशिक विभाग, नाशिक यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१६) श्रीमती. आशा अफझल खान पठाण (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांची सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
१७) श्रीमती राजलक्ष्मी सफिक शाह (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर बढती) अतिरिक्त विभागीय आयुक्त (जनरल), कोकण विभाग, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१८) श्रीमती सोनाली नीळकंठ मुळे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, अमरावती यांची संचालक, OBC, बहुजन कल्याण, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
१९) गजेंद्र चिमंतराव बावणे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, बुलढाणा यांची आयुक्त, भू सर्वेक्षण विकास संस्था, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
२०) श्रीमती प्रतिभा समाधान इंगळे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, सांगली यांची आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या