गेल्या काही दिवसांपासून अकोट शहरांत केवळ गोवंश मांस वगळता इतर कोणतीही अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त नव्हते,त्यामुळे ह्या शहरांत सगळीकडे "आलवेल" असून अवैध धंद्यांचा "कायमचा बंदोबस्त" झाल्याचे दिसून येत होते.अकोट शहरांत गेल्या चार वर्षांपासून आयपीएस अधिकारी दिल्याचा हा परिणाम असावा असे चित्र होते,मात्र आज बाळापूरच्या "चार्ज"मध्ये असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने ह्याच शहरांत येऊन "वरली मटक्या"वर कारवाई करीत तब्बल ११ आरोपींना अटक करून १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत हा "जबर वार" झाल्याची शहरांत चर्चा आहे.
अकोट उपविभागातील आयपीएस अनमोल मित्तल यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदावर नव्याने पुन्हा आयपीएस असलेल्या निखिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.परंतु ते अजून पर्यंत ही रुजू न झाल्याने ह्या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा बाळापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आलेला आहे.
आज दि.१७/०७/२०२५ रोजी त्यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोट शहर पो.स्टे. हद्दीतील शहर परीसरातील पोपटखेड रोड,पोष्ट ऑफिस समोरील सोनु चौकाकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला, तसेच अंजनगांव रोडवरील धारोळी वेस जवळच्या मोकळ्या जागेमध्ये असे वेगवेगळ्या तीन ठिकाणी काही ईसम वरली मटक्याचे आकडे लिहुन देत आहे व लोकां कडुन पैसे घेउन हारजीतचा खेळ खेळत आहेत.अशी पक्की खबर मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खात्री पट्ल्यावर गजानन पडघन, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापुर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बाळापुर येथिल अधिकारी व पो.अंमलदार पोउपनि. जितेंद्र हरणे,पो.कॉ. संतोष करांगळे, पो.कॉ.मयुर लिखाडे,पो.कॉ. गजानन शिंदे, पो.कॉ.योगेश चौधरी,पो.कॉ. भुषण चौधरी, पो.कॉ.शिवप्रसाद कांगणे, पो.कॉ.अंश ईरपाते, पो.कॉ. आकाश वाघमारे, पो.कॉ. मंगेश शेगोकार,पो.कॉ.पवन वडगावे यांनी पो.स्टे.अकोट शहर हददीतील परीसरामध्ये पोपटखेड रोडवरील गुळाचा चहा नाव असलेल्या टपरीचे बाजुला, पोष्ट ऑफिस समोरील सोनुचौकाकडे जाणा-या रोडच्या कडेला तसेच अंजनगांव रोडवरील घारोळी वेस इमाण खान यांचे कुलरचे दुकाना जवळ मोकळ्या जागेमध्ये असे वेगवेगळ्या तिन ठिकाणी खुलेआम सुरू असलेल्या वरली मटक्यावर जुगार प्रतिबंधक कार्यवाही केली असता त्यात,
कार्यवाही क्रमांक १) आरोपी नामे १) संजय सुखदेव खंडारे, वय ४१ वर्ष रा.शिवापुर ता. अकोट जि.अकोला, २.) पदमाकर हरिदास डहाके, वय ४५ वर्ष रा.उमरा ता.अकोट जि. अकोला, ३.) सत्यपाल रामजी गवई, वय ५३ वर्ष रा.अडगांव ता.तेल्हारा जि.अकोला,यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातील वरली मटका साहीत्य, दोन मोबाईल किं. १७००० रुपये नगदी रोख रक्कम २७०० रुपये, एकुण १९७०० रुपयेचा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्ती पंचनाम्या प्रमाणे पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
कार्यवाही क्रमांक २) आरोपी १.) नितीन अरविंद खांडेकर,वय ४१ वर्ष रा.केशवराज वेटाळ,अकोट ता.अकोट जि.अकोला, २.) श्रीकांत अशोकराव किल्लेदार,वय ४५ वर्ष रा. केशवराज वेटाळ,अकोट ता.अकोट जि. अकोला, ३.) शेख सलीम शेख कल्लु, वय ५० वर्ष रा.अंबोळी वेस अकोट ता.अकोट जि. अकोला, ४.) निलेश हिरालाल कहार, वय ४२ वर्ष रा.टाकपुरा अकोट ता. अकोट जि. अकोला, ५.) सुधिर दत्तोपंत सोनकर, वय ५८ वर्ष रा.भवानीपुरा अकोट ता. अकोट जि. अकोला, यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातील नगदी ७००० रुपये आरोपी जवळील मोबाईल एकुण २३२०० रुपये तसेच घटनास्थळा वरील जुने वापरते दोन मोबाईल एक जुना वापरता विवो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे १२००० रुपये व एक जुना वापरता सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे ११००० रुपये असा एकुण ४६२०० रुपयेचा मुददेमाल मिळून आल्याने ते जप्ती पंचनाम्या प्रमाणे पंचांसमक्ष जप्त करण्यात आले.
कार्यवाही क्रमांक ३) आरोपी १.) गजानन मुरलीधर लबडे, वय ३२ वर्ष रा.सतिमंदीर अकोट ता.अकोट जि. अकोला, २.) संजय उत्तमराव तायडे, वय ४४ वर्ष रा.राहुल नगर अकोट ता.अकोट जि.अकोला, ३.) शेख कलीम शेख सलीम, वय २७ वर्ष रा.अडगांव ता.अकोट जि.अकोला पंचासमक्ष तीन्ही आरोपीतांकडून अंगझडती मध्ये त्यांचे ताब्यातील वरली मटका साहीत्य,मोबाईल नगदी रक्कम असा एकुण ११४३० रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्ती पंचनाम्या प्रमाणे पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदरच्या तिन्ही कार्यवाही मध्ये १ लाख ४३ हजार रुपयांचा मुददेमाल मिळुन आला आहे.
वरून नमुद आरोपी ताब्यात घेवुन मुददेमालासह पो.स्टे.अकोट शहर येथे आणुन कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनीयम प्रमाणे त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक,अर्चित चांडक व अप्पर पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेडडी अकोला यांचे मार्गदर्शनाखाली "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.



0 टिप्पण्या