छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी या महत्वपूर्ण पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सगळी "लाज शरम" सोडून लाखांच्या रक्कमेत शासन पगार देत असतानाही "हरामाची कमाई" करण्यासाठी २३ लाख रुपये आधीच लाच घेतल्यावरही आणखी ५ लाखांची लाच मागितल्याने तो "गोत्यात" आला आणि एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला शासकीय "आदरातिथ्य" करण्यासाठी पोलिसांच्या "अंधार कोठडी"त घातला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर विनोद खिरोळकर नावाचा एक अधिकारी कार्यरत आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला त्याच्याकडे असलेल्या शेतजमिनीचा असलेला वर्ग २ बदलून ती जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करावयाची होती.त्यासाठी त्याने सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले तरी त्याचे काम होत नसल्याने त्याने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर नामक अधिकाऱ्याला भेटून आपली समस्या सांगितली.ह्या कामासाठी खिरोळकरने लाखो रुपयांची मागणी केली.त्यांचा हा सौदा २५ लाखांत ठरल्यावर २३ लाखांत फायनल झाला. तक्रारदाराकडून २३ लाख रुपये आधीच घेण्यात आले होते.मात्र हरामाच्या पैशांची लालूच सुटल्याने खिरोलकरणे तक्रारदाराला त्यानंतर पुन्हा १८ लाखांची मागणी केली होती.मात्र तक्रारदाराला ही रक्कम द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली "आपबिती" सांगितली असता त्यांची रीतसर तक्रार नोंदवून घेण्यात आली.त्या तक्रारीची सत्यता पडताळणी करण्यात आली असता तथ्य आढळून आल्याने सापळा रचून लाचखोर उप जिल्हाधिकाऱ्याला "जाळ्या"त पकडण्याचे ठरले.
निवासी उप जिल्हाधिकारी विनोद खिरोळकरणे ५ लाखांची लाचेची रक्कम निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून त्रिभुवन याच्याकडे देण्याचे सांगण्यात आल्यावर तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारत असताना ह्या कारकुणाला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ह्या दोघांनाही अटक केली असून पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेतच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली असून,निवासी उप जिल्हाधिकाऱ्याच्या "लाचखोरी"ने राज्यातील महसूल विभाग चर्चेत आला असून महसूल खात्यात होणारा "भ्रष्टाचारा"चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.




0 टिप्पण्या