डॉक्टरची शाळा घेणाऱ्या पीएसआय गडलिंगेला नव्या एस.पी.नी दिले निलंबनाचे बक्षिस...



   अकोला जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक ह्यांना आपल्या पदाचा प्रभार घेऊन चार दिवस पूर्ण होण्याआधीच दहीहंडा पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या पीएसआय प्रभुदास गडलिंगेने पोलिस दलाच्या वतीने कडक "सॅल्युट ठोकून" चांगलीच "सलामी" दिल्याने नवे पोलिस अधीक्षक सुद्धा गांगरून गेले आहेत. पीएसआय. गडलिंगेने अकोला पोलिस दलाची खरी ओळख ह्या अधिकाऱ्यांना करून दिली असल्याचे आम जनतेत बोलल्या जात आहे.
 
    आज सकाळपासूनच जिल्ह्यातील दहीहंडा पोलिस स्टेशनला पोलिस उप निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रभुदास गडलिंगे नामक पोलिस अधिकाऱ्याचा आणि स्थानिक प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आपसातील वादावादीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या व्हिडिओ मध्ये दिसणारे पीएसआय गडलिंगे हे दारूच्या नशेत डॉक्टर सोबत  गैरवर्तन करीत असल्याचे दिसत आहे.नुकताच पोलिस अधीक्षक पदाचा प्रभार घेतलेल्या अर्चित चांडक ह्यांना आरोपी,गुन्हेगारांवर कारवाई करण्याआधी डॉक्टर सारख्या सामाजिक वलय आलेल्या व्यक्तीसोबत अरेरावी करणाऱ्या आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई करून त्याला निलंबित करण्याची अप्रिय व कठोर कारवाई करावी लागली आहे. हे त्यांचेच नाही तर ह्या जिल्ह्यातील जनतेचे दुर्दैव आहे.


    दि.२७/०५/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे आदेशाने पो.स्टे. दहिहांडा येथे नेमणूकीस असलेले पोउपनि प्रभूदास गडलिंगे यांनी दि.२५/०५/२०२५ रोजी कोणतेही शासकिय कामकाज नसताना  शासकिय गणवेषात "दारू पिउन" प्राथमिक आरोग्य केंद्र दहिहांडाच्या आवारामध्ये सकाळी ११/३० ते १२/०० वा. सुमारास शासकिय तेथील वैद्यकिय अधिकारी यांना एकेरी भाषेत "तू दवाख्याना मध्ये हजर राहत नाही,आज दवाखाना बंद आहे" असे बोलून त्यांचे सोबत वाद घालून "तूझी तक्रार करतो" असे बोलून शिवीगाळ करून धमक्या दिल्या. याचा व्हिडीओ मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून व्हायरल झाल्याने पोलीस अधिक्षक,अकोला यांनी त्याची दखल घेत,पोउपनि.प्रभूदास गडलिंगे याने जनमाणसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली. अधिकाराचा दुरुपयोग केला म्हणून दि.२७/०५/२०२५ रोजी पो.उप.नि प्रभूदास गडलिंगे पो.स्टे. दहिहांडा यांचे निलबंन आदेश काढले आहेत. तसेच ह्या पीएसआयच्या प्राथमिक चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. हया आदेशाचे माध्यमातून इतर अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी अशाप्रकारे गैरवर्तन केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही असाच सर्व अधिकारी व पोलीस अमंलदार यांना स्पष्ट संकेत पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या