अकोला जिल्हा परिषदेतील मनमानी प्रतिनियुक्ती रद्द करा: आकाश कोकाटे



    अकोला जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून तात्पुरत्या प्रतिनियुक्ती आदेशाच्या नावाखाली ठान मांडुन बसलेल्या व विभागीय आयुक्तांची कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता प्रतिनियुक्ती आदेश काढण्यात आलेले आहेत. हे आदेश काढत असताना तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रचंड मनमानी केली असून जवळच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना मलईदार जागी बसविण्यात आले आहे.


   अकोल्यातील पत्रकार आकाश नंदू कोकाटे यांनी अकोला जिल्हा परिषदेत नव्यानेच रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना ह्याबाबत एका तक्रार पत्राद्वारे अवगत केले असून सदरहू आदेश त्वरित रद्द करून ह्या प्रतिनियुक्ती आदेशांवर योग्य ती कारवाई करावी असे म्हटले आहे.


   आपल्या स्तरावरून चौकशी करून तसेच प्रशासकीय दृष्टीने प्रतिनियुक्त्या करायच्या असतील तर त्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांच्या पुर्व परवानगीनेच करण्यात याव्यात असे स्पष्ट शासन निर्णय दि.२७/६/२००६ च्या ग्रामविकास विभागाने काढलेले आहेत. यानंतर करण्यात येणाऱ्या प्रतिनियुक्ती शासन परिपत्रकानुसारच करण्यात याव्यात तसेच करण्यात आलेल्या आदेशांची चौकशी करून ते प्रतिनियुक्ती आदेश रद्द न झाल्यास आपल्या कार्यालयात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल.असा इशारा आकाश नंदू कोकाटे यांनी दिला असून त्या तक्रारीच्या प्रति ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री अकोला जिल्हा व विभागीय आयुक्त अमरावती यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या