महाराष्ट्र विधानसभेचे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या अधिवेशनासाठी आलेल्या दोन राजकीय पक्षांच्या गटात विधान भवनाच्या आवारात काल दि.१७/७/२०२५ रोजी सायंकाळी घडलेल्या मारहाण प्रकरणी ५:४० ते ६:०५ वाजताच्या दरम्यान मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल गुरुवार दि.१७/७/२०२५ रोजी महाराष्ट्राचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन-२०२५ च्या अनुषंगाने विधान भवन इमारत मेन पोर्च या ठिकाणी ०५:४० वाजताचे दरम्यान
सर्जेराव बबन टकले (गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते) व नितीन हिंदुराव देशमुख (जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते) आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या ६ ते ७ अनोळखी इसमांनी विधानभवन इमारतीच्या आवारात बेकायदेशीर जमाव जमवून आपाआपसात एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहान केल्याने तसेच त्यांना आवरायला गेलेल्या पोलिसांवर ते त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना वरील आरोपींनी त्यांच्यावर सुद्धा हात उगारल्याने मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात
१) गुन्हा नोंद क्रमांक:- १३५/२०२५कलम १८९(१)(a),१८९(१),१८९(२),१९०,१९१(२), १९४(२),१९५(१),१९५(२),३५२,१८९(१)(b)(भा.न्या.सं.2023) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधान भवन, सुरक्षा अधिकारी सचिन विठ्ठल पाटणे,वय-४१ वर्षे यांच्या तक्रारीवरून आज दि.१८/७/२०२५ ला दुपारी ४:१८ वाजताच्या दरम्यान सदरहू गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलिस उप निरीक्षक दिलीप वावळ हे करीत आहेत.


0 टिप्पण्या