अकोट शहरातील राष्ट्रीय महामार्ग १६१ A ला राज्य महामार्ग क्रमांक २०४ शी जोडणारा बायपास रस्ता प्रस्तावित करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तात्विक मान्यता दिली असून,सदर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. अशी माहिती खा.अनुप धोत्रे यांनी दिली आहे.
अकोला-अकोट-बैतूल कॉरिडॉर (एन एच १६१ A) वरील वाहतूक भार आणि अकोट शहराच्या शहरी हद्दीतील वाहतुकीचा ताण लक्षात घेता,आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या समवेत,खासदार अनुप धोत्रे यांनी अकोटकरांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता म्हणून या बायपास रस्त्याची मागणी केली होती.
हा बायपास रस्ता एन.एच.१६१ A व राज्य महामार्ग २०४ यांना शहरा बाहेरून जोडेल.
यामुळे आंतर-जिल्हा आणि आंतर-राज्य प्रवास अधिक सुलभ व जलद होईल .
अकोट शहरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण व पायाभूत सुविधांवरील ताण कमी होईल.
ब्रिटिशकालीन ऐतिहासिक मार्गाला नवसंजीवनी देईल.
अकोट,अकोला,मध्यप्रदेश,मराठवाडा, तेलंगाणा व आंध्रप्रदेश यांना सक्षम रस्ते संपर्क देणाऱ्या या बायपासमुळे प्रादेशिक विकासाला वेग येईल,असा ठाम विश्वास अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.


0 टिप्पण्या