पळपुटा लाचखोर पोलिस शिपाई अखेर एसीबीच्या ताब्यात...



     एका दाखल प्रकरणात तक्रारदाराचा जबाब घेण्यासाठी झालेला खर्च आणि पोलिस तपासात मदत करण्यासाठी म्हणून चार हजार रुपयांची लाच मागणीणकरून ती स्वीकारणाऱ्या जालना जिल्ह्यातील मंठा पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराविरुद्ध एसीबीच्या पथकाने कारवाई केली.


     सदरहू कारवाई बुधवारी दि.९/७/२०२५ ला सायंकाळी ७ वाजत्याच्या दरम्यान मंठा शहरातील तहसील रोड भागात करण्यात आली. राजू परसराम राठोड,वय-४४ असे एसीबी कारवाई करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

     लाचेची तक्रार दाखल करणारा तक्रारदार आणि त्याच्या गावातील एका व्यक्तीचा १५ जून रोजी वाद झाला होता. या प्रकरणात मंठा पोलिस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या  आहेत. या हाणामारीत तक्रारदार जखमी झाल्याने जालना येथील रुग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी हवालदार राठोड  जबाब घेण्यासाठी खासगी वाहनाने गेले होते. त्या वाहनाचा खर्च १५०० रुपये व तपासात मदत करण्यासाठी ३००० रुपये, अशी ४,५०० रुपयांची लाच राठोड याने तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. 

     परंतु तक्रारदाराला ही लाच रक्कम द्यावयाची नसल्याने त्यांनी याबाबत जालना  एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बुधवारी सायंकाळी मंठा शहरातील तहसील रोडवरील हॉटेल समृद्धीसमोर एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. तक्रारदाराच्या कामासाठी ४,५०० रुपये लाचेची मागणी करीत ती रक्कम तडजोड करून करून ४००० रुपये स्वीकारत असताना पथकाने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडून कारवाई केली होती.

    त्याचवेळी इशारा होताच बाहेर आलेले लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईवेळी ओळखले. त्याच वेळी त्याने खिशातील लाचेची रक्कम फेकून देत  पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु एसीबीच्या पथकाने राठोड यास ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध तो काम करीत असलेल्या मंठा पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या