अकोट नगर पालिकेचे मुख्याधिकारी बेंबरे आज नाहीतर उद्या पदाचा भार सोडणार..?



   अकोला जिल्ह्यातील अकोट नगर पालिकेचे आल्यापासून वादग्रस्त असलेले मुख्याधिकारी डॉ.नरेंद्र बेंबरे हे आज किंवा उद्या आपल्या शिरावर असलेला "पदाचा भार" येथेच सोडून चंद्रपूर जिल्ह्यात रवाना होत असल्याची माहिती असून त्यातील सत्यता पडताळणी केली असता ही "अफवा" नसल्याचे कळले आहे.

    आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत शक्य न झाल्यास ते सोमवारी "एकतर्फी" चार्ज देवून कार्यमुक्त होण्याची शक्यता आहे.त्यांच्या बदलीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून ही सगळी "ऑफ द रेकॉर्ड" चर्चा सुरू आहे.याबाबत लवकरच सविस्तर वृत्त देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

   ते अकोट वरून निघाल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात जात असल्याची माहिती असून नेमकी कोणती नगर पालिका त्यांना देण्यात आली हे मात्र अद्यापही "गुलदस्त्या"त आहे.मात्र ती नगर पालिका वरोरा असू शकते. असाच सगळ्यांनी  एक अंदाज वर्तविला आहे. नाहीत सर्वांनाच मूर्ख बनवून अगदी जवळच श्री संत गजानन महाराजांच्या चरणी शेगाव येथे सुद्धा जावू शकतात.काहीच निश्चित सांगता येत नाही.


   मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे हे कधी नव्हे ते आज सकाळपासूनच नगर पालिकेतील आपल्या केबिनमध्ये बसले असून शिल्लक ठेवलेल्या म्हणा किंवा राहिलेल्या कामांचा "निपटारा" करण्यात व्यस्त आहेत.

   आज ते जुन्या आणि गेल्या दोन वर्षांपासून पेंडिंग असलेल्या गुंठेवारीच्या प्रकरणांना मंजूर करून "रेग्युलर" करीत असल्याची ताजी माहिती आहे.आज त्यांची ही जुनी कामे हातावेगळे न झाल्यास ते अकोटमधील आपल्या पदाचा चार्ज दोन दिवसांनी म्हणजेच सोमवारी सुद्धा सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    त्यांच्या जागेवर अचलपूर येथून धीरज गोहाड हे येत असल्याची वर्तुळात चर्चा आहे,मात्र ती खरी आहे की खोटी हे येत्या एक दोन दिवसांतच कळेल.

    बेंबरे अकोट शहरातून जात असल्याची चर्चा  शहरात अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरली असून त्यांचे खास हितचिंतक ते जातील तेव्हा "फटाके फोडून" आनंद साजरा करण्याच्या तयारीत असून त्यांनी आजच "पेढे वाटून" आपल्या मनातील "भावनां"ना वाट मोकळी करून दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या