शेतीच्या कामानिमित्त आणि शेजारी असल्याने वेळी अवेळी नेहमी एकमेकांच्या घरी जाणे येणे असणे हे "विश्वासाचे प्रतीक" आहे.मात्र ह्या विश्वासाच्या नात्याला "कलंक" लावणाऱ्या सचिन गजानन गोमासे, ह्या २२ वर्षीय शेजाऱ्याने "विश्वासघात" करून त्याच घरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बळजबरीने "लैंगीक अत्याचार" करून ओळखीच्या "नात्यात शेण" खाल्ल्याने ती अल्पवयीन मुलगी "गर्भवती झाल्याच्या" प्रकरणात दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
अकोट दिनांक २१.०७.२०२५ रोजी येथील वि. अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश श्री. बी.एम. पाटील यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेष प्रकरण क्रमांक २५/२०२५ मधील अप.क.१६९/ २०२५, कलम ६४.६५(११.३०५१(२) (१) बीएनएस सह कलम ४,६,८.१० पोस्को ऍक्टमधील आरोपी सचिन गजानन गोमासे, वय २२ वर्षे, विद्यार्थी, रा.मुंडगाव,ता. अकोट, जि.अकोला याने १३ वर्षीय अल्पवयीन पीडिता घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेवून तिच्यावर लैंगीक अत्यावार करून गर्भवती केल्याचे प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज येथील वि.अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी आज दिनांक २१/७/२०२५ ला नामंजूर केला आहे.
या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तीवाद केला की, दि. ०६.०४. २०२५ रोजी १३ वर्षीय अल्पवयीन पिडीतेच्या आईने अर्जदार आरोपी सचिन गोमासे याच्या विरूध्द फिर्याद दिली की, अल्पवयीन पिडीता आठव्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी सचिन गोमासे हा फिर्यादीचे पतीसोबत शेतीच्या कामासाठी फिर्यादीच्या घरी येत जात असे.
पिडीतेने दि.०३.०४.२०२५ रोजी आईला सांगीतले की,दि.९.१९.२०२४ रोजी दुपारच्या सुमारास पिडीता मुलगी घरी एकटी असतांना आरोपी सचिन गोमासे हा घरात आला व त्याने आतून घराचा दरवाजा लावून घेतला व जबरदस्तीने १३ वर्षीय पिडीत मुली सोबत शारिरीक संबंध केले व तिला धमकावले की, तु कोणला काही सांगीतले तर तुला मारून टाकेल व निघून गेला. त्यानंतर पिडीत मुलीला मासिक पाळी आली नाही म्हणून तिच्या आईने डॉक्टरांना दाखविले.परंतु डॉक्टरांनी सांगीतले की, मुलीचे वय कमी आहे व रक्त कमी असल्याने अनियमतता असू शकते त्यानंतर दि. ०५.०४.२०२५ रोजी पिडीत मुलीचे पोट दुखत असल्याने तिचे आईने मेडीकल दुकानातून किट आणून चेक केले असता त्यामध्ये पिडीता मुलगी गर्भवती असल्याचे समजले. पिडीतेला आईने विचारपूस केली तेव्हा दि. ०७.०४.२०२५ रोजी वरिल प्रमाणे आरोपी बाबत माहिती पिडीतेने आईला दिली व आईने दिलेल्या फिर्यादी प्रमाणे आरोपी सचिन गोमासे विरुध्द वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद केला की, सदर गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे या प्रकरणामध्ये पिडीतेच्या वैद्यकीय अहवालामध्ये ती गर्भवती असल्याचे नमुद आहे तसेच या प्रकरणात पिडीतेचे शासकीय दवाखाना अकोला येथे गर्भपात देखील करण्यात आला आहे. पिडीतेचे वय फक्त १३ वर्षे चार महिने असल्याबाबत पिडीतेचा जन्म दाखला उपलब्ध आहे.तसेच अनेक साक्षीदारांचे बयान देखील या प्रकरणात तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक योगीता ठाकरे, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी नोंदवून आरोपी विरूध्द दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केलेले आहे. आरोपीला जामीन दिल्यास अल्पवयीन पिडीत मुलीच्या जिवाला धोका निर्माण होवू शकतो,तसेच साधीदारावर तो दबाव आणू शकतो व त्याला कायद्याचा राहणार नाही. आरोपी विरूध्द शिक्षा होण्याइतपत पुरावा दोषारोपपत्रामध्ये उपलब्ध आाहे. या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेची देखील तरतुद आहे. सरकार तर्फ हा खटला आरोपीला कारागृहामध्ये ठेवून जलद गतीने चालविण्या करीता सरकारपक्ष तयार आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज नामंजुर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादा नंतर वि.कोर्टाने आरोपी सचिन गोमासेचा जामीन अर्ज नामंजुर केला आहे.




0 टिप्पण्या