महाराष्ट्र पोलिस दलातील विभागीय अर्हता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या व पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदावर पदोन्नती देण्याबाबतच्या सन २०२४-२०२५ च्या निवडसूचीतील पात्र १८३ पोलिस अंमलदारांना २५ टक्के कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नती देण्याबाबत आज दिनांक २४/७/२०२५ ला राज्याच्या गृह खात्याने निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
सदरहू अंमलदारांकडून महसूल विभागाची पसंती घेऊन त्यांना त्यानुसार महसुल विभाग वाटप करण्यात आले आहेत.
पोलीस अंमलदारांना २५ टक्के कोट्यातील निःशस्त्र पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदावर पदोन्नतीने महसूल विभाग निहाय पदस्थापना देण्यात आली आहे.









0 टिप्पण्या