राज्य विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असतानाच राज्यातील विविध विभागांतील राज्य शासनाच्या सेवेतील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे राज्य शासनाने काल दि.११/७/२०२५ रोजी आदेश काढले असून गेल्या काही दिवसांतील ही बदल्यांची चौथी यादी आहे.
१) ओम प्रकाश बकोरिया (आयएएस: आरआर: २००६) आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांना महासंचालक, महाऊर्जा, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
२) अमगोथू श्री रंगा नाईक (आयएएस: आरआर: २००९) आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
३) डॉ. कादंबरी बलकवडे (आयएएस: आरआर: २०१०) महासंचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे यांना आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
४.) मकरंद देशमुख (आयएएस: एससीएस: २०१३) व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई यांना मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई यांचे सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
५) सुनील महिंद्रकर (IAS:SCS:२०१५) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि वैद्यकीय वनस्पती मंडळ, पुणे यांची हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या