नाराजी व्यक्त करताच डीजीपी आणि चीफ सेक्रेटरी सरन्यायाधीशांच्या भेटीला...



   महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने आयोजित केलेल्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात त्यांच्या महाराष्ट्रातील मुंबईच्या पहिल्या भेटीत राज्याच्या मुख्य सचिव,पोलिस महासंचालक व पोलिस आयुक्तांनी प्रोटोकॉल न पाळल्याबद्दल सरन्यायाधीशांनी त्यांची कानउघडणी करीत नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर लगेच काही वेळातच पोलिस महासंचालक रश्मि शुक्ला, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक चैत्यभूमीवर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या भेटीसाठी तातडीने दाखल झाल्या आहेत.

   सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या कानउघडणीनंतर रश्मि शुक्ला आणि सुजाता सौनिक हे चैत्यभूमीवर दाखल झालेल्या आहेत.सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सत्कार समारंभात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरुन सरन्यायाधीशांकडून नाराजी व्यक्त केली होती.

  सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आजच्या सत्कार समारंभात मुंबईला आले असता, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक गैरहजर होत्या. त्यावरून गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भूषण गवई हे चैत्यभूमीवर भेट देण्यासाठी गेले. त्यावेळी रश्मि शुक्ला आणि सुजाता सौनिक यांनी चैत्यभूमीवर धाव घेतली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या