महाराष्ट्रात पहिल्यांदाच आल्यावर "प्रोटोकॉल" न पाळला गेल्याने सरन्यायाधीश भूषण गवई "नाराज"...



  भारताचे सरन्यायाधीश झाल्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई हे रविवारी पहिल्यांदाच मुंबईत पोहोचले. त्यावेळी राज्याचे  मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त यांचेकडून त्यांचे स्वागत करण्याचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही.यावर सरन्यायाधीशांनी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या कार्यक्रमात चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.
  सरन्यायाधीश गवई म्हणाले,"मला अशा किरकोळ मुद्द्यांवर बोलायचे नाही,परंतु महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी प्रोटोकॉलचे पालन करत नाहीत याबद्दल माझी निराशा झाली आहे." लोकशाहीचे तिन्ही स्तंभ समान आहेत आणि त्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे, असेही सरन्यायाधीश म्हणाले

   जर भारताचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच महाराष्ट्राला भेट देत असतील तर मुख्य सचिव, डीजीपी आणि मुंबईचे पोलिस आयुक्त यांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. असे न केल्याने विचार करायला भाग पाडले जात आहे.

    महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने मुंबईत सरन्यायाधीशांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या दरम्यान न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले की, जेव्हा एखाद्या संस्थेचा प्रमुख पहिल्यांदाच एखाद्या राज्यात येत असतो, विशेषतः जेव्हा तो त्याच राज्यातील असतो, तेव्हा त्यांनी स्वतः विचार करावा की त्यांच्याकडून केलेले वर्तन योग्य होते की नाही.

    सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मराठीत उपस्थितांना संबोधित केले आणि त्यांना मिळालेल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. याआधी त्यांनी मुंबईतील चैत्यभूमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकालाही भेट दिली.


    भाषणादरम्यान लोकांचा त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम पाहून सरन्यायाधीश गवई भावुक झाले. ते म्हणाले की, मी सर्वांचा खूप आभारी आहे. मला मिळालेल्या प्रेमाने आणि आदराने मी भारावून गेलो आहे. मला हे प्रेम गेल्या ४० वर्षांपासून मिळत आहे. आजचा सोहळा अविस्मरणीय आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत.१४ मे रोजी मी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली,तेव्हा महाराष्ट्राने माझ्यावर खूप प्रेम केले. राज्य भरातील लोकांनी हा सोहळा पाहण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु मर्यादांमुळे मी सर्वांना सहभागी करू शकलो नाही.

   देश केवळ मजबूत झाला नाही तर सामाजिक आणि आर्थिक आघाड्यांवरही विकसित झाला आहे आणि तो अजूनही वाढत आहे. देशाची मूलभूत रचना मजबूत आहे आणि संविधानाचे तिन्ही स्तंभ समान आहेत. संविधानाच्या सर्व भागांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे.न्यायपालिका, कार्यकारी मंडळ किंवा संसद हे सर्वोच्च नाही, परंतु भारताचे संविधान सर्वोच्च आहे आणि तिन्ही अंगांना संविधानानुसार काम करावे लागते.

   बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) च्या सत्कार समारंभात सरन्यायाधीश बी.आर.गवई यांनी म्हटले की न्यायाधीश जमिनीवरील वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. आजच्या न्यायव्यवस्थेला मानवी अनुभवातील गुंतागुंतीकडे दुर्लक्ष करून कायदेशीर बाबी पूर्णपणे काळ्या आणि पांढऱ्या रंगात पाहणे परवडणारे नाही.

   न्यायव्यवस्थेतील लोकांपासून अंतर राखणे प्रभावी नाही, यावर सरन्यायाधीशांनी भर दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी लोकांशी संवाद साधणे टाळावे ही धारणा त्यांनी नाकारली.


   ह्याच कार्यक्रमात सर न्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेल्या ५० महत्त्वाच्या न्यायनिवाड्यांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सरन्यायाधीश यांच्या मातोश्री कमलताई गवई देखील उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या