पूजा खेडकरला कधीही अटक होवू शकते...



   माजी सनदी अधिकारी पूजा खेडकरसाठी आजचा दिवस फार मोठा वाईट सिद्ध झाला असून, दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज खारीज केला आहे.बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून अवैधरीत्या आरक्षणाचा लाभ मिळविण्याचा तिने प्रयत्न केला आहे का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने युपीएससीला दिले आहेत. याशिवाय,युपीएससी मधील कुणी पूजा खेडकरला तिच्या ह्या कामात मदत केली,याचाही तपास करण्याचे निर्देश सुद्धा  न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत.


   आलिशान ऑडी कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर बाबत युपीएससीने कालच महत्त्वाचा निर्णय दिला असून पूजा खेडकरला युपीएससीने दोषी ठरवत आणि तिची उमेदवारीही रद्द करुन टाकली आहे. महाराष्ट्र कॅडरची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिने  बनावट प्रमाणपत्र यांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. पूजा खेडकरने सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी झाली असून त्या अनुषंगानेच त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या