अकोला जिल्हा परिषदचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास तापी यांची ग्रामविकास विभागाने काल काढलेल्या एका आदेशानुसार अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तापी यांनी याआधी काही वर्षे अकोट पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर काम केलेले असून या भागात एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.
किशोर शिंदे हे बदलून गेले तेव्हापासून अकोट पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी देण्यात आले नव्हते तर कालिदास तापी हे बार्शीटाकळी पंचायत समिती सोबतच अकोला पंचायत समिती व अकोला जिल्हा परिषदचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचाही अतिरिक्त कारभार पाहत होते.एकूणच अकोला जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रचंड अनुशेष असून "लायकी नसलेले" अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे "प्रतिनियुक्ती" च्या नावावर महत्त्वाचे विभाग व "कमाईचे टेबल" सोपविण्यात आलेले आहेत."इंचा फुटात" बसत नसलेले अनेक "भोपयसुते" खुर्च्या आवरून बसल्याने नाहकच सर्वसामान्य व गरजवंतांची मात्र "अडवणूक" होत आहे.



0 टिप्पण्या