अकोट शहरचे ठाणेदार तपन कोल्हे सुट्टीवर की सक्तीच्या रजेवर.???



   आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्कर लॉरेन्स बिष्णोई याच्या हस्तकांनी अकोट शहरात विक्री केलेल्या गावठी कट्ट्याच्या जप्तीची कारवाई करून शहर पोलीसांनी अकोट शहराचे नाव रातोरात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले आहे.आणि त्यानंतर नव्यानेच आलेले आयपीएस असलेले डीवायएसपी अनमोल मित्तल यांनी पुढे जाऊन तपास करीत आणखी एक पुण्यातील आरोपी जेरबंद केल्याने अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी या तपास प्रकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला आहे.मात्र या पत्रकार परिषदेला अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कोल्हे वा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके हे उपस्थित नसल्याने त्यादिवशी पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांच्या चर्चेत हाच एक मुद्दा चघळला जात असल्याची माहिती आहे.


   या प्रकरणातील सुरुवातीला तपास करणारे पीएसआय राजेश जवरे यांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेत घेण्यात आले असून त्यांचा व त्यांच्या टीमचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे. हे प्रकरण आता डीवायएसपी अनमोल मित्तल  हाताळत असून अकोट शहर, एलसीबी व डीवायएसपी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अकोट शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या ह्या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण सहा आरोपिंना अटक करण्यात आलेली असून अजून तितकेच आरोपी अटक होण्याची शक्यता असल्याचे कळते. चौकशी पथक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आणखी काही आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

    तीन गावठी कट्टे व अनेक कारतूस जप्त करण्यात आले असून या प्रकरणांत आतापर्यंत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी प्रेसनोट प्रसिद्धीस दिल्याने नेमके तपास अधिकरी कोण आहेत ? याविषयी मीडिया मध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

    आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे प्रकरण अकोट शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आले आणि त्याचा गुन्हा देखील याच पोलीस स्टेशनला दाखल झालेला असला तरी गेल्या तीन चार दिवससांपासून अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुट्टीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.संपूर्ण देशात खळबळ उडवून देणारे प्रकरण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले व दररोज नवनवीन आरोपी सापडत असतांना त्या ठाण्याचे ठाणेदार यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सुट्टी मंजूर केलीच कशी हा जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. मीडियाच्या चर्चेनुसार अकोटच्या ठाणेदार तपन कोल्हे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र खरे खोटे काय ते ठाणेदार कोल्हे व एसपी बच्चनसिंग हेच सांगू शकतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या